ENG vs PAK 2nd Test 2024 Day 1 Live Streaming: दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला हरवून पराभवाचा बदला घेणार पाकिस्तान संघ; सामन्याचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल? जाणून घ्या

भारतात पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपणाचे अधिकार फॅनकोडकडे आहेत. फॅनकोड ॲप सह वेबसाइटवर इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान दुसऱ्या कसोटी सामन्याचे स्ट्रीमिंग आणि मालिका पाहू शकता.

Photo Credit- X

ENG vs PAK 2nd Test 2024 Day 1 Live Streaming: (ENG vs PAK) संघात दुसरा कसोटी सामना आज 15 ऑक्टोबरपासून मंगळवारी मुलतान येथील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर (Multan Cricket Stadium) खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा संघ इंग्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाशी भिडणार आहे. या मालिकेत इंग्लंड 1-0 ने आघाडीवर आहे. दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर फिरकी गोलंदाज अबरार अहमद आजारपणामुळे मालिकेतून बाहेर आहे. (हेही वाचा:2024 ICC Women’s T20 World Cup Points Table Update: पाकिस्तानच्या पराभवानंतर टीम इंडिया विश्वचषकातून बाहेर; जाणून घ्या पॉइंट टेबल)

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना 2024 कधी आणि कुठे खेळला जाईल?

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना 15 ऑक्टोबर मंगळवारी पासून मुलतान येथील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 पासून खेळवला जाईल. सामन्याची नाणेफेक सकाळी 10:00 वाजता होईल.

सामन्याचे  प्रसारण कुठे पहाल?

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका 2024 साठी कोणत्याही अधिकृत प्रसारणाची घोषणा करण्यात आली नाही. पाकिस्तानमध्ये, कसोटी मालिका 2024चे प्रसारण PTV Sports आणि ASports वर केले जाईल.

थेट प्रक्षेपण कसे पहावे?

फॅमकोडकडे पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याच्या थेट प्रसारणाचे अधिकार आहेत. पाकिस्तानमध्ये सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग ए-स्पोर्ट्स, टेन स्पोर्ट्स आणि पीटीव्ही स्पोर्ट्सवर उपलब्ध असेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now