श्रीलंकाविरुद्ध टी-20 मालिकेत पराभवानंतर पाकिस्तानात हंगाम, सफराझ अहमद याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यासाठी विधानसभेत प्रस्ताव
या दरम्यान, पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या विधान सभामध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून सरफराज अहमदला हटविण्याची मागणी करणारा ठराव सादर करण्यात आला आहे.
आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये आठव्या क्रमांकावरील श्रीलंका (Sri Lanka) संघाने अव्वल क्रमांकावरील पाकिस्तान (Pakistan) संघाला धूळ चालली. टी -20 सामन्यांच्या मालिकेत संघाचा लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. आणि आता हे प्रकरण थेट तेथील विधानसभेत पोहोचले आहे. श्रीलंकाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर खेळाडूंपासून प्रशिक्षक मिसबाह-उल-हकपर्यंत सर्वच टीकेचे पात्र बनले आहेत. या दरम्यान, पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या विधान सभामध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून सरफराज अहमद (Sarfraz Ahmed) यांना हटविण्याची मागणी करणारा ठराव सादर करण्यात आला आहे. वनडे मालिका गमावल्यानंतर श्रीलंकेने 3 सामन्यांची टी -20 मालिकेत 3-0 ने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. हा पराभव पाकिस्तानला खूप लाजिरवाणा ठरला. (PAK vs SL मॅचदरम्यान कोलहीच्या पाकिस्तानी चाहत्याकडून 'विराट' निमंत्रण म्हणाला 'पाकमध्ये येऊन खेळ'; भारतीय क्रिकेटप्रेमिंनी सोशल मीडियावर केले कौतुक)
मुस्लिम लीग-नवाजचे आमदार मलिक इक्बाल झहीर यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. या म्हटले आहे की, पंजाब विधानसभेने श्रीलंकेविरूद्ध टी -20 मालिकेत पाकिस्तानच्या झालेल्या स्वीपबद्दल तीव्र खेद आणि संताप व्यक्त केला आहे. यानंतर टी-20 फॉर्मेटचा पहिला क्रमांक असणारा पाकिस्तानचा संघ स्वतःपेक्षा बर्याच खालच्या क्रमांकाच्या संघाकडून पराभूत झाला आहे, असे या प्रस्तावात लिहिले आहे. या पराभवामुळे पाकिस्तानी समाजात शोक आणि संताप आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांनी या एकतर्फी पराभवाची चौकशी करावी अशी मागणी या ठरावात करण्यात आली आहे. शिवाय, सरफराजला त्वरित कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी देखील केली आहे.
दरम्यान, एंजेलो मॅथ्यूज आणि अन्य दहा ज्येष्ठ खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला. यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने युवा खेळाडूंची टीम पाकिस्तानला पाठविली. वनडे सामन्यात श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला, परंतु या संघाने तीन टी-20 मालिकेतील सर्व सामने जिंकून सर्वांना चकित केले.