SA vs PAK 1st Test 2024 Day 3 Live Streaming: तिसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या नजरा मोठ्या धावसंख्येवर, तर दक्षिण आफ्रिका विकेटची गरज; येथे जाणून घ्या भारतात थेट सामन्याचा आनंद कधी, कुठे आणि कसा घेणार

दोन्ही संघांमधील हा सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जात आहे. आज खेळाचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने 22 षटकात 3 विकेट गमावून 88 धावा केल्या होत्या. पाहुणा संघ अजूनही 2 धावांनी मागे आहे.

South Africa National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 1st Test 2024 Day 3 Live Streaming: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला  26 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जात आहे. आज खेळाचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने 22 षटकात 3 विकेट गमावून 88 धावा केल्या होत्या. पाहुणा संघ अजूनही 2 धावांनी मागे आहे. पाकिस्तानसाठी सध्या बाबर आझम 34 चेंडूत नाबाद 16 धावा आणि सौद शकील 8 चेंडूत 8 धावा करून नाबाद आहे. याशिवाय दुसऱ्या दिवशी सॅम अयुब 27 धावा करून बाद झाला, कर्णधार शान मसूद 28 धावा करून बाद झाला आणि कामरान गुलाम 4 धावा करून बाद झाला.

तिसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या नजरा मोठ्या धावसंख्येवर

तर दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात आतापर्यंत मार्को जॅनसेनने 4 षटकात 17 धावा देत 2 बळी घेतले आहेत. तर कागिसो रबाडाला 1 बळी मिळाला. सध्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या नजरा मोठ्या धावसंख्येवर असतील. पाहुण्या संघाला दक्षिण आफ्रिकेला मोठे लक्ष्य द्यायचे आहे.

किती वाजता सुरु होणार सामना?

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ आज, शनिवार, 28 डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जाईल.

कुठे पाहणार सामना?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिका भारतातील टीव्हीवर स्पोर्ट्स 18-1 SD आणि स्पोर्ट्स 18-1 HD चॅनेलवर थेट प्रसारित केली जाईल. JioCinema ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना इथून पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाचा आनंद घेता येईल.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका: टोनी डी झोर्झी, एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जेन्सन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, डेन पॅटरसन.

पाकिस्तान: शान मसूद (कर्णधार), सईम अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, सलमान आगा, आमेर जमाल, नसीम शाह, खुर्रम शहजाद, मोहम्मद अब्बास

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement