Australia vs Pakistan 1st ODI Scorecard: ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संघ कोसळला, कांगारुला विजयासाठी मिळाले 204 धावांचे लक्ष्य
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानने ऑस्ट्रेलियसमोर विजयासाठी 204 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Australia National Cricket Team vs Pakistan National Cricket Team: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका 2024 (ODI Series 2024) मधील पहिला सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधला हा सामना मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सकाळी 9 वाजल्यापासून खेळवला जात आहे. या मालिकेत पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. तर पाकिस्तानची कमान मोहम्मद रिझवानच्या हातात आहे. त्याआधी, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानने ऑस्ट्रेलियसमोर विजयासाठी 204 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
पाकिस्तान संघाची वाईट सुरुवात
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात काही खास झाली नाही. दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला बाबर आझम काही विशेष करु शकला नाही. तो 37 धावा करुन बाद झाला. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान क्रिजवर जास्त वेळ थांबण्याचा प्रयत्न केला पण त्याला दुसरा कोणता फलंदाज साथ देवू शकला नाही. तो 44 धावा करुन बाद झाला. त्यानंतर नसीम शाहच्या 40 धावांच्या जोरावर पाकिस्तान कसा बसा 203 धावा पर्यंत पोहचला. त्यानंतर संपूर्ण संघ 46.4 षटकात बाद झाला.
ऑस्ट्रेलियाची घातक गोलंदाजी
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाचे पहिल्या षटकापासून पाकिस्तानच्या फलंदाजावर वर्चस्व दिसून आले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर कर्णधार पॅट कमिन्स आणि ॲडम झाम्पाला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. शॉन ॲबॉट आणि मार्नस लॅबुशेन यांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. आता ऑस्ट्रेलियाला मालिकेत आघाडी घेण्यासाठी 50 षटकात 204 धावा करायच्या आहेत.