Pakistan Squad for 1st Test Multan: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानने संघ केला जाहीर, 'या' खेळांडूना मिळाली संधी
खराब फॉर्ममुळे आफ्रिदीला या महिन्याच्या सुरुवातीला बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटीतून वगळण्यात आले होते.
PAK vs ENG 1st Test 2024: इंग्लंडविरुद्ध 7 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (PAK vs ENG Test Series 2024) पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानने आपल्या संघाची घोषणा केला आहे. मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या पाकिस्तानच्या 15 सदस्यीय संघात वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचे पुनरागमन झाले आहे. खराब फॉर्ममुळे आफ्रिदीला या महिन्याच्या सुरुवातीला बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटीतून वगळण्यात आले होते. (हे देखील वाचा: England vs Australia 3rd ODI 2024 Highlights: तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 46 धावांनी केला पराभव, हॅरी ब्रूकने झळकावले शतक, येथे पाहा हायलाइट्स)
नोमान अली आणि आमिर जमाल संघात परतले
आफ्रिदीशिवाय डावखुरा फिरकीपटू नोमान अली आणि आमिर जमाल संघात परतले आहेत. नोमानने पाकिस्तानसाठी एकूण 15 कसोटी खेळल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 47 विकेट घेतल्या आहेत. या 37 वर्षीय अनुभवी खेळाडूने जुलै 2023 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. खुर्रम शहजादच्या दुखापतीमुळे आमिर जमालचा पाकिस्तान संघात पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला.
पाकिस्तान संघ
शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), बाबर आझम, मोहम्मद रिझवान, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद हुरैरा, सैम अयुब, सलमान अली आगा, सरफराज अहमद, आमेर जमाल, नोमान अली, अबरार अहमद, मीर हमजा, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडचे अपडेटेड वेळापत्रक:
7-11 ऑक्टोबर - पहिली कसोटी, मुलतान
15-19 ऑक्टोबर - दुसरी कसोटी, मुलतान
24-28 ऑक्टोबर - तिसरी कसोटी, रावळपिंडी