PAK vs SL 2nd ODI: बाबर आझम याने विराट कोहली, जावेद मियांदाद यांना टाकले मागे; 11 वे शतक झळकावत नोंदविला विशेष विक्रम
बाबरने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी पाकिस्तानी कर्णधार जावेद मियांदाद यासारख्या दिग्गजांना मागे टाकले. बाबरने आपले अकरावे शतक ठोकले आणि सर्वात कमी डावात हा पराक्रम करणारा तो आशियातील एकमेव फलंदाज ठरला.
सोमवारी पाकिस्तानचा (Pakistan) सलामीवीर बाबर आझम (Babar Azam) ने श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध तीन वनडे सामन्यांच्या दुसर्या मॅचमध्ये विशेष कामगिरी केली. पाकिस्तान आणि श्रीलंकामधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यावर दुसऱ्या मॅचमध्ये पाक फलंदाजांनी सुरुवातीपासून वर्चस्व राखले. यात बाबरने महत्वाची भूमिका बजावली. त्याने 105 चेंडूत आठ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 115 धावांची शानदार शासकीय खेळी केली. या शतकासह बाबरने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि माजी पाकिस्तानी कर्णधार जावेद मियांदाद (Javed Miandad) यासारख्या दिग्गजांना मागे टाकले. वनडे सामन्यात बाबरने आपले अकरावे शतक ठोकले आणि सर्वात कमी डावात हा पराक्रम करणारा तो आशियातील एकमेव फलंदाज ठरला. विराटला मागे टाकत बाबर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. (PAK vs SL: हसन अली याच्योसबतच्या मैत्रीबद्दल विचारताच शादाब खान याने उत्तरादाखल दिलेल्या प्रतिक्रियेत टाकली गुगली Video)
बाबरने आपल्या 71 व्या डावात 11 वे वनडे शतक केले होते, तर विराटने 82 डावांमध्ये हा आकडा गाठला. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला पहिल्या क्रमांकावर आहे. आमलाने 64 डावात हा पराक्रम केला होता. तर दुसऱ्या क्रमांकावर आफ्रिकेचाच 65 डावांसह क्विंटन डि कॉक विराजमान आहे. दुसरीकडे, एका कॅलेंडर वर्षात वनडे क्रिकेटमध्ये १,००० धावांचा टप्पा ओलांडणारा बाबर हा पाकिस्तानचा पहिला खेळाडू ठरला. यासाठी त्याने माजी कर्णधार जावेद मियांदाद यांनी केलेला विक्रम मोडला. मियांदादने 1987 मध्ये 21 सामन्यात 1,000 धावा केल्या होत्या, तर आझमने केवळ 19 डावात ही कामगिरी केली. माजी मधल्या फळीतील फलंदाज मोहम्मद युसूफ (Mohammad Yusuf) आणि माजी फलंदाज आणि सध्याचे प्रशिक्षक मिस्बाह-उल-हक (Misbah Ul-Haq) यांनी संयुक्तपणे 23 डावात एका कॅलेंडर इयरमध्ये 1,000 धावा पूर्ण केल्या आणि तिसरे स्थान मिळवले.
दरम्यान, मॅचबद्दल बोलले तर, पाकिस्तानसाठी बाबरशिवाय फखर जमान याने 54 धावा केल्या. आणि उस्मान शिंवरी याने गोलंदाजीत 5 गडी बाद केले. हरीस सोहेल याने 40 धावांचे योगदान दिले. तब्बल 10 वर्षांनी पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जात आहे.