PAK vs SA: T20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत पाकिस्तान संघाने अनोख्या शैलीत केलं सेलिब्रेशन, पहा Hasan Ali याचा हसून लोटपोट करणारा Video
यादरम्यान, दक्षिण आफ्रिकेदरम्यान खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांची टी-20 मालिका खिशात घातल्यानंतर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने एक व्हिडिओ सामायिक केला आहे.
PAK vs SA T20I 2021: सोशल मीडियावर आजकाल पाकिस्तानच्या पेशावर (Peshawar) शहरातील ‘दनानीर मुबीन’ (Dananeer Mobeen) या 19 वर्षीय ‘कंटेंट क्रिएटर’ चा एक व्हिडिओ खूप वेगवान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती आणि तिचे काही मित्र डोंगराळ भागात मजा करताना दिसत आहेत. या दरम्यान, मुबिन हातात कॅमेरा धरताना ऐकू येते की, 'ही आमची गाडी आहे, हे आम्ही आहोत आणि ही आमची पॉरी (म्हणजे पार्टी)' आहे. मुबीनच्या या व्हिडिओचा सोशल मीडियावर आनंद घेतला जात आहे. यादरम्यान, दक्षिण आफ्रिके (South Africa) दरम्यान खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांची टी-20 मालिका खिशात घातल्यानंतर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने (Hasan Ali) एक व्हिडिओ सामायिक केला आहे. या व्हिडिओमध्ये, तो मोबाइल फोन हातात घेताना ऐकला जाऊ शकतो, "हा मी आहे, ही माझी टीम आहे आणि आम्ही मालिका जिंकली आहे आणि पॉरी करीत आहोत." (PAK vs SA: दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पाकिस्तानने रचला इतिहास, 100 आंतरराष्ट्रीय T20 जिंकणारा बनला जगातील पहिला संघ)
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिकेचा तिसरा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात यजमान संघाने अतिथी संघ आफ्रिकेला चार विकेट्सने पराभूत केले. तिसर्या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पहिले फलंदाजी करणाऱ्या आफ्रिका संघाने निर्धारित ओव्हरमध्ये आठ विकेट गमावून 164 धावा केल्या. त्यानंतर, पाकिस्तान संघ लक्ष्यचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि आठ चेंडू शिल्लक असताना सहा गडी राखून हे लक्ष्य गाठले. कर्णधार बाबर आझमने संघासाठी सर्वाधिक 30 चेंडूंत 44 धावांची खेळी केली आणि संघाने 2-1 अशी मालिका खिशात घातली. दुसरीकडे, यजमान संघासाठी हा विजय खास ठरला. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 100 सामने जिंकणारा पाकिस्तान पहिला संघ ठरला.
दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचे तर डेविड मिलरने आफ्रिकी संघासाठी 7 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक नाबाद 85 धावा केल्या. पाकिस्तानकडून संघाचा सलामी फलंदाज मोहम्मद रिझवानने 30 चेंडूत 42 आणि कर्णधार बाबर आझमनेही 30 चेंडूंत 44 धावांचे मोलाचे योगदान दिले. मोहम्मद नवाजने नाबाद 18 आणि हसन अलीने 7 चेंडूत नाबाद 20 धावा करून संघाला विजयीरेष ओलांडून दिली.