PAK vs AUS: लाहोर कसोटीत David Warner सहाव्या षटकात बाद झाला असता; पण ही मोठी चूक पाकिस्तानला नडली, नेटकरी म्हणाले - ‘त्यांना वॉकओव्हर द्या’!

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना खेळला जात आहे. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रादरम्यान, ऑस्ट्रेलिया सलामीवीर डेविड वॉर्नरच्या बॅटच्या कडेला लागून बॉल यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानकडे गेली. मात्र, रिझवान किंवा खेळाडूंनी अपील केले नाही. पण रिप्लेमध्ये वॉर्नरच्या बॅटच्या कडेला बॉल लागल्याचे दिसले.

डेव्हिड वॉर्नर याला लाइफलाइन (Photo Credit: Twitter)

PAK vs AUS, Lahore Test: पाकिस्तान (Pakistan) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात लाहोरच्या (Lahore) गद्दाफी स्टेडियमवर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना खेळला जात आहे. रावळपिंडी आणि कराची येथील पहिले दोनही सामने अनिर्णित राहिले होते, त्यामुळे दोन्ही संघासाठी लाहोर कसोटी सामना निर्णायक ठरणार आहे. एकीकडे ऑस्ट्रेलिया तब्ब्ल दोन दशकाहून अधिक काळानंतर पाकिस्तानात कसोटी मालिका जिंकण्यासाठी उत्साहित आहे, तर पाकिस्तान देखील मायदेशात टेस्ट सिरीज जिंकण्यासाठी आतुर असेल. तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात पाहुण्या संघाने शानदार पुनरागमन करून पाकिस्तानला 268 धावांवर गुंडाळून 20 धावांत सात विकेट्स घेतल्या. यश पहिल्या डावात 123 धावांची आघाडी मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) आणि उस्मान ख्वाजा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली; तथापि, वॉर्नरला यावेळी नशिबाजी साथ मिळाली. (PAK vs AUS: लाहोर कसोटीत Pat Cummins याची कमाल, अशी कामगिरी करणारा Ashwin नंतरचा ठरला दुसरा खेळाडू)

चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रादरम्यान, वॉर्नरच्या बॅटच्या कडेला लागून चेंडू यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानकडे गेली. मात्र, रिझवान किंवा गोलंदाज हसन अली यांनी अपील केले नाही. पण रिप्लेमध्ये वॉर्नरच्या बॅटच्या कडेला बॉल लागल्याचे दिसून आले आणि पाकिस्तानने सामन्यांमध्ये पहिले यश मिळविण्याची मोठी संधी गमावली. रिप्ले मोठ्या पडद्यावर दाखवला जात असताना हसनला हसू आवरता आले नाही. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या सहाव्या षटकात ही घटना घडली असून त्यावेळी वॉर्नर 16 धावांवर खेळत होता. आपल्याला मिळालेल्या जीवनदानाचा फायदा घेत 51 धावा चोपल्या.

सोशल मीडियावर देखील पाकिस्तानची चूक लक्षात येताच नेटकऱ्यांनी देखील खेळाडूंची शाळा घेतली आणि यजमान संघाने ऑस्ट्रेलियाला वॉक-ओव्हर द्यावा असे म्हटले.

आपण किती दुर्दैवी असू शकतो??

त्यांना वॉकओव्हर द्या!

मालिकेत पाकिस्तानचा आदरातिथ्य!

आपल्याला काय भोगावे लागणार आहे याचा सारांश!

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून 391 धावांच्या प्रत्युत्तरात पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांनी केलेल्या शानदार गोलंदाजी करून बुधवारी लाहोर येथे सुरू असलेल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानचा संघ 268 धावांवर गुंडाळला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now