NZ vs PAK 4th T20I Live Streming: पाक संघ करणार पलटवार का किवी संघ नोंदवणार सलग चौथा विजय, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह?

बाबर आझम (Babar Azam) वगळता पाकिस्तानचा एकही फलंदाज सातत्यपूर्ण कामगिरी करू शकलेला नाही.

PAK vs NZ (Photo Credit - Twitter)

NZ vs PAK 4th T20I: पाकिस्तान क्रिकेट संघाने न्यूझीलंडमध्ये सलग 3 टी-20 सामने गमावले आहेत. शाहीन आफ्रिदीच्या (Shain Afridi) नेतृत्वाखाली पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यातील मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी क्राइस्टचर्च येथे खेळवला जाणार आहे. पाकिस्तानी संघ पलटवार करण्याच्या इराद्याने या सामन्यात उतरणार आहे, तर यजमान किवी संघाला सलग चौथ्या विजयाची नोंद करायची आहे. बाबर आझम (Babar Azam) वगळता पाकिस्तानचा एकही फलंदाज सातत्यपूर्ण कामगिरी करू शकलेला नाही. या मालिकेत बाबरने सलग 3 अर्धशतके झळकावली आहेत, मात्र त्याच्या संघाला अद्याप विजय मिळालेला नाही. (हे देखील वाचा: Team India ने एका दगडात मारले दोन पक्षी, 'या' विशेष यादीत नोंदवले आपले अव्वल स्थान)

कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह?

दरम्यान, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील चौथा टी-20 सामना शुक्रवारी (19 जानेवारी) हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 11.40 वाजता खेळवला जाईल. तसेच, सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात होणार नाही त्यामुळे तुम्हाला हा सामना अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

फिन ऍलनने दुसऱ्या सामन्यात केला कहर

तिसऱ्या टी-20 मध्ये, फिन ऍलनने न्यूझीलंडसाठी बॅटने कहर केला. त्याने 62 चेंडूत 137 धावांची मोठी खेळी करत संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. ऍलनने या खेळीत 16 षटकार आणि 5 चौकार मारले होते. एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली होती. याशिवाय तो किवी संघासाठी टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.

चौथ्या टी-20 साठी न्यूझीलंड आणि पाकिस्तानची संभाव्य इलेव्हन:

न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, टिम सेफर्ट (विकेटकीपर), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर (कर्णधार), अॅडम मिल्ने, ईश सोधी, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन / मॅट हेन्री.

पाकिस्तान: मोहम्मद रिझवान, सॅम अयुब, बाबर आझम, फखर जमान, इफ्तिखार अहमद, आझम खान (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी (कर्णधार), मोहम्मद वसीम, हरिस रौफ, जमान खान.