On This Day in 2013: सात वर्षांपूर्वी आजच्या दिवशी रोहित शर्माच्या नेतृत्वात वर्चस्वाच्या दिशेने MI ने टाकलेपहिले पाऊल, मुंबई इंडियन्स पहिल्यांदा बनली IPL विजेता
त्यावेळी या स्पर्धेच्या इतिहासाला केवळ नवीन चॅम्पियनच मिळाला नाही, परंतु लीगमध्ये मुंबईस्थित फ्रँचायझीच्या वर्चस्वाची ही सुरुवात होती. आजवर मुंबई इंडियन्सने एकूणच चार आयपीएल चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत
आजच्या दिवशी, 26 मे 2013 मध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कोलकाताच्या इडन गार्डन्सच्या पहिल्यांदा आयपीएल (IPL) विजेतेपदाचा मान पटकावला. त्यावेळी या स्पर्धेच्या इतिहासाला केवळ नवीन चॅम्पियनच मिळाला नाही, परंतु लीगमध्ये मुंबईस्थित फ्रँचायझीच्या वर्चस्वाची ही सुरुवात होती. आजवर मुंबई इंडियन्सने एकूणच चार आयपीएल चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत आणि योगायोगाने त्या सर्व पर्यायी वर्षांत आल्या आहेत; म्हणजेच 2013, 2015, 2017 आणि 2019. मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) पराभव करत पहिले जेतेपद जिंकले. रोहितने आपली जबरदस्त नेतृत्व क्षमता दाखवत पाच वेळा अंतिम फेरी गाठणार्या एमएस धोनीच्या चेन्नई संघाला पराभवाला सामोरे जाण्यास भाग पाडले. प्रथम फलंदाजी करण्याचा मुंबई इंडियन्सचा निर्णय चुकीचा वाटला जेव्हा त्यांनी 16 धावांवर तीन अव्वल फलंदाजांच्या विकेट गमावल्या. ड्वेन स्मिथ 4, कर्णधार रोहित शर्मा 2 आणि आदित्य तारे खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतले. (On This Day: आजच्या दिवशी सौरव गांगुली-राहुल द्रविड यांनी वर्ल्ड कप सामन्यात नोंदवली त्रिशतकी भागीदारी, दोघांनी झळकावले तुफानी शतक)
2 वेळा चॅम्पियन चेन्नईचा सामना करताना मुंबईने स्वतःवर दडपण येऊ दिले नाही. आघाडीचे तीन फलंदाज बाद झाल्यावर कीरोन पोलार्डने मोर्चा सांभाळा आणि 9 विकेट गमावून मुंबईने 148 धावा केल्या. पोलार्ड 60 धावांवर नाबाद परतला. प्रत्युत्तरात चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही आणि लसिथ मलिंगाने पहिल्याच ओव्हरमध्ये चेन्नईला दोन झटके दिले. माईक हसी, सुरेश रैना, एस बद्रीनाथ, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा आणि मुरली विजय खराब फलंदाजीमुळे बाद झाले. चेन्नईने 39 धावांवर 6 विकेट गमावल्या. यानंतर चेन्नईची धावसंख्या 50 पर्यंत पोहोचली आणि त्यानंतर त्यांचे दोन सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू अॅल्बी मॉर्केल आणि क्रिस मॉरिस यांनीही विकेट गमावली. चेन्नईने 58 धावांत 8 गडी गमावले.
यानंतर धोनीने जोरदार फटकेबाजी सुरू केली आणि चेन्नईची धावसंख्या 100 च्या जवळ आणली परंतु 18 व्या ओव्हरमध्ये अश्विनने विकेट गमावली. अखेरीस धोनीने बरीच फटकेबाजी केली आणि 45 चेंडूत नाबाद 63 धावा फटकावल्या परंतु त्याचा संघ सामना गमावून बसला आणि मुंबईला प्रथमच आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळाला.