Olympics 2028: क्रिकेटचा ऑलिंपिक स्पर्धेत समावेश केल्याने कोणकोणते फायदे होणार? आयसीसीने दिली महत्वाची माहिती
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (International Cricket Council) लॉस एंजेलिस (Los Angeles) येथे 2028 मध्ये पार पडणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत (Olympic) क्रिकेटचा (Cricket) समावेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश केल्याने कोणकोणते फायदे होणार? याचीही माहिती आसीसीने दिली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (International Cricket Council) लॉस एंजेलिस (Los Angeles) येथे 2028 मध्ये पार पडणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत (Olympic) क्रिकेटचा (Cricket) समावेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश केल्याने कोणकोणते फायदे होणार? याचीही माहिती आसीसीने दिली आहे. आयसीसीचा असा विश्वास आहे की, जर लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केला गेला तर, भारतीय उपखंडात (Indian Subcontinent) दर्शकांची संख्या वाढविण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकते. कारण, येथे इतर खेळांपेक्षा क्रिकेटला जास्त महत्त्व दिले जाते. हे देखील वाचा- कुस्तीपटू सुशील कुमार याला अखेर अटक; दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई
आयसीसीच्या म्हणण्यानुसार, इंग्लंडमध्ये 2019 मध्ये पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषकात 54 कोटी 50 लाख प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवली होती. दरम्यान आयसीसीने लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे, ज्याची एक प्रत आयएएनएसकडे आहे. विश्वचषकाला 4.6 अब्ज व्यूज मिळाले होते. तर, युट्युबवपर 3 कोटी 10 लाख लोकांनी विश्वचषक पाहिला होता. आयसीसीने या आकड्यांची 2016 रिओ ऑलिंपिकशी तुलना केली आहे. रिओ ऑलिंपिकला भारतात 19 कोटी 10 लाख प्रेक्षकांनी पाहिले होते. तर, 2019 मधील विश्वचषकाला तब्बल 54 कोटी 50 लाख प्रेक्षकांनी पाहिल्याचे आयसीसीने सांगितले आहे.
आयसीसीने आपल्या 92 सदस्य देशांसमवेत सर्वेक्षण केले. ज्यात ऑलिंपिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यासाठी मोठी पसंती दर्शवली आहे. आयसीसीच्या सर्वेक्षणानुसार, 74 टक्के सदस्यांनी क्रिकेटचा ऑलिंपिक स्पर्धेत समावेश करण्याला पाठिंबा दर्शवला आहे. जर ऑलिंपिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश केला तर, त्यांना त्यांच्या सरकारकडून आर्थिक पाठबळ मिळेल. तसेच 89 टक्के लोक म्हणतात की, जर क्रिकेट कायमच ऑलिम्पिक खेळात भाग झाला तर त्यांना वार्षिक आर्थिक पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. आयसीसीचे 104 सदस्य देश असून त्यांचे 12 पूर्ण सदस्य आणि 92 सदस्य आहेत. आयसीसीच्या म्हणण्यानुसार, पुरुष आणि महिला क्रिकेटचा टी -20 स्वरूपात लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये समावेश केला गेला तर ते प्रेक्षकांच्या तुलनेत बर्याच आर्थिक फायद्याचे ठरू शकते.
आयसीसीच्या प्रस्तावानुसार, लॉस एंजेलिस ऑलिम्पिक दरम्यान 21 जुलै ते ऑगस्ट या कालावधीत पुरुष आणि महिला संघांमध्ये टी-20 स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यात आठ संघ सहभागी होणार असून एकूण 16 सामने खेळले जाणार आहेत. महत्वाचे म्हणजे, लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी क्रिकेटला त्रास होऊ शकतो. कारण सध्या क्रिकेटचा ऑलिम्पिक वेळापत्रकात समावेश नाही आणि लॉस एंजेलिस स्थानिक आयोजन समितीने हा अतिरिक्त खेळ म्हणून आणावा लागेल.
क्रिकेटसाठी हा एकमेव पर्याय आहे. कारण, टोकियो 2020 आणि पॅरिस 2022 ऑलिम्पिकमध्ये अन्य कोणत्याही खेळाचा समावेश करता येणार नाही. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील खेळांचा समावेश करण्याची प्रक्रिया 2022 च्या मध्यापासून सुरू होईल. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती 2020 च्या मध्यामध्ये या सामन्यांचा समावेश करण्याच्या नियंत्रण समितीच्या प्रस्तावावर निर्णय घेईल. अमेरिकेतील प्रसिद्ध खेळ असलेल्या बेसबॉल आणि सॉफ्टबॉलकडून क्रिकेटला एक कठीण आव्हान मिळू शकेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)