NZ vs SA 1st Test 2022: भारतावर वर्चस्व गाजवलेला दक्षिण आफ्रिका संघ अवघ्या 95 धावांत गारद, न्यूझीलंडच्या Matt Henry याचे 23 धावांत 7 बळी
यजमान न्यूझीलंड आणि पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघात आजपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ पूर्णपणे कोलमडला. मॅट हेन्रीने विक्रमी 7 बळी घेतले आणि पाहुण्या Proteas संघ फक्त 95 धावांवर ढेर झाला. कोणत्याही फलंदाजाने विकेटवर टिकून राहण्याचे धाडस दाखवले नाही आणि किवी गोलंदाजांचा सामना करण्यात ते अपयशी ठरले.
NZ vs SA 1st Test 2022: यजमान न्यूझीलंड (New Zealand) आणि पाहुण्या दक्षिण आफ्रिका (South Africa) संघात आजपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. किवी कर्णधार टॉम लाथमने (Tom Latham) दिवसाच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि पाहुण्या संघाला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ पूर्णपणे कोलमडला. मॅट हेन्रीने (Matt Hentry) विक्रमी 7 बळी घेतले आणि पाहुण्या Proteas संघ फक्त 95 धावांवर ढेर झाला. डीन एल्गर (Dean Elgar), एडन मार्करम, रॅसी व्हॅन डर ड्युसेन यांना हेन्रीने झटपट बाद केले. या सामन्यात भारतीय फलंदाज पत्त्यासारखे विखुरले गेले. कोणत्याही फलंदाजाने विकेटवर टिकून राहण्याचे धाडस दाखवले नाही आणि किवी गोलंदाजांचा सामना करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे संपूर्ण संघाला मिळून 100 धावाही करता आल्या नाहीत.
हेन्रीला ट्रेंट बोल्टच्या जागी संघात स्थान मिळाले, परंतु त्याने 7/23 अशा आकडेवारीसह गोलंदाजीचे अप्रतिम प्रदर्शन केले. हेन्रीने खेळ न करता येणारे काही चेंडू टाकले आणि अखेरीस एका डावात न्यूझीलंडची तिसरी सर्वोत्तम कसोटी आकडी नोंदवली. पाहुण्या संघासाठी झुबेर हमजाने सर्वाधिक 25 धावा केल्या. किवी संघाविरुद्ध पहिल्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेने सात विशेषज्ञ फलंदाजांची निवड केली आणि झुबेर हमझाला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले, जो दोन वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळला होता. किगन पीटरसन बाहेर पडल्यानंतर त्याची निवड करण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात मोठी समस्या बॉलर मॅट हेन्री बनला, ज्याने 23 धावांत 7 विकेट्स एकट्याने घेतल्या. याशिवाय काईल जेमीसन, टिम साउदी आणि नील वॅगनर यांनी 1-1 विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव सुरुवातीपासून रुळावरून घसरलेला दिसत होता. संघाची पहिली विकेट अवघ्या 1 धावेवर पडली. 40 धावांच्या आत संघाने 4 आघाडीचे फलंदाज गमावले, त्यापैकी मॅट हेन्रीने 2 बळी पडले. 7 फलंदाजांना दुहेरी आकडा गाठणेही कठीण झाले यावरून Proteas संघाच्या खराब फलंदाजीचा अंदाज लावता येतो. यापैकी 2 फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी त्याचे फक्त 4 फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले, ज्यात सारेल एरवी, एडन मार्करम, झुबेर हमझा आणि यष्टिरक्षक फलंदाज काइल वेरेन यांचा समावेश आहे. यापूर्वी Proteas संघाने मायदेशात पहिली कसोटी गमावल्यावर दमदार पुनरागमन करून भारताविरुद्ध जबरदस्त विजय मिळवला होता. अशा परिस्थितीत आता न्यूझीलंड दौऱ्यावर देखील दक्षिण आफ्रिका संघ मागे पडल्यावर अशीच कमाल करू शकतो की नाही हे पाहणे मनोरंजक असेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)