NZ vs PAK 2nd Test: नसीम शाह आणि मोहम्मद अब्बास यांच्यातील मजेदार संभाषण स्टंप माइकमध्ये कैद, ऐकून डोक्याला हात माराल! (Watch Video)
अब्बास स्ट्राईकवर असताना नसीमने की त्याला एक धाव काढून दे, म्हणजे तो स्ट्राईकवर येईल. तथापि, त्याने हिंदीमध्ये आपल्या जोडीदारास ज्याप्रकारे मसेज पोहचवला तो अत्यंत मजेदार होता.
NZ vs PAK 2nd Test 2021: न्यूझीलंड (New Zealand) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात क्राइस्टचर्चच्या (Christchurch) मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. दुसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या पहिल्या डावा दरम्यान नसीम शाह (Naseem Shah) आणि मोहम्मद अब्बास (Mohammad Abbas) यांच्यात एक संवाद जबरदस्त व्हायरल होत आहे. 83 धावांवर चार विकेट गमावल्यानंतर पाकिस्तानने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात 297 धावा केल्या. अखेरचे दोन फलंदाज अब्बास आणि नसीम शाह यांचे क्रीजवर बोलत असतानाचे त्यांचे संभाषण स्टंप माइकमध्ये कैद झाले.दोन्ही फलंदाजांमध्ये हिंदीमध्ये संभाषण सुरु होते. ही मजेदार घटना पाकिस्तानच्या पहिल्या डावात 83व्या ओव्हर दरम्यान घडली जेव्हां नसीम शहा 8 धावांवर आणि अब्बास शुन्यावर फलंदाजी करत होते. यावेळी अब्बास स्ट्राईकवर असताना नसीमने की त्याला एक धाव काढून दे, म्हणजे तो स्ट्राईकवर येईल. तथापि, त्याने हिंदीमध्ये आपल्या जोडीदारास ज्याप्रकारे मसेज पोहचवला तो अत्यंत मजेदार होता आणि स्टंप माइकमध्ये ते सर्व कैद झाले, ज्याचा व्हिडिओ एका चाहत्याने आपल्या ट्विटरवरून शेअर केला. दोन्ही फलंदाजांमधील संभाषण ऐकून आपण नक्कीच डोक्याला हात मारून घ्याल. (ICC Team of The Decade: 'ICC ने दशकची टी-20 नाही तर IPL टीम घोषित केली', बाबर आझमला स्थान न दिल्याने संतप्त शोएब अख्तरची प्रतिक्रिया)
नसीमने अब्बासला सांगितले की धावा करण्याची सर्व जबाबदारी त्याच्यावर आहे आणि एक धाव घेण्याचा सल्ला दिला. नसीम अब्बासला म्हणला, ‘अब्बास भाई, आपको पता हैं सारी जिम्मेदारी मेरे उपर हैं. सिंगल करना है वरना डांट पड जायेगी. (अब्बास भाई, तुला माहित आहे, सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. एक धाव घ्यावी लागेल नाहीतर ओरडा बसेल) पहा हा व्हिडिओ:
दरम्यान, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. पहिल्या दिवशी काईल जेमीसनच्या पाच विकेटच्या जोरावर किवी टीमने पाकिस्तानचा पहिला डाव 297 धावांवर गुंडाळला. अझर अली आणि कर्णधार मोहम्मद रिझवान यांनी 88 धावांची भर घालून संघाचा डाव हाताळला. अझरने 93 आणि कर्णधार रिझवानने 61 धावांची अर्धशतकी खेळी केली. शिवाय, फहिम अश्रफने 48 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून जेमिसनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या, तर ट्रेंट बोल्ट आणि टिम साउथीने प्रत्येकी 2 विकेट्स, तसेच मॅट हेन्रीने एक विकेट घेतली. त्यानंतर, दुसऱ्या दिवसाच्या चहापानच्या वेळेपर्यंत यजमान संघाने 3 विकेट गमावून 145 धावा केल्या आहेत.