NZ vs PAK 1st Test 2020: ‘आऊट हो जा...’, न्यूझीलंडविरुद्ध दिवसभर गोलंदाजी करून वैतागलेल्या पाकिस्तानी यासिर शाहचे अपशब्द, पहा व्हिडिओ

यादरम्यान सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पाकिस्तानी फिरकीपटू गोलंदाज यासिर शाह वैतागलेल्याचे दिसून आले आणि चेंडू फेकल्यानंतर त्याच्याकडून अपशब्द बाहेर पडले जे स्टंप-माईकवर कैद झाले.

Yasir Shah (Photo Credits: Getty Images)

NZ vs PAK 1st Test 2020: न्यूझीलंड (New Zealand) आणि पाकिस्तान (Pakistan) संघात माऊंट माउंगनुई येथे पहिला बॉक्सिंग डे टेस्ट सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी यजमान किवी टीमने 3 विकेट गमावून 222 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा किवी कर्णधार केन विल्यमसन आणि हेन्री निकोल्स (Henry Nicholls) खेळपट्टीवर खेळत होते. यादरम्यान सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. विल्यमसन नाबाद 84 धावांवर आणि निकोल्स नाबाद 27 धावा करून खेळत होते तेव्हा पाकिस्तानी फिरकीपटू गोलंदाज यासिर शाह 77वी ओव्हर टाकण्यासाठी आला. या दरम्यान यासीर शाह (Yasir Shah) वैतागलेल्याचे दिसून आले आणि चेंडू फेकल्यानंतर त्याच्याकडून अपशब्द बाहेर पडले जे स्टंप-माईकवर कैद झाले आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Most T20I Runs in 2020: केएल राहुल याला मागे टाकत 40 वर्षीय पाकिस्तानी मोहम्मद हाफीजने यंदा टी-20 मध्ये केली कमाल)

टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडल हे सलामीवीर शाहीन आफ्रिदीच्या माऱ्यासमोर स्वस्तात माघारी परतले. मात्र, विल्यम्सन आणि टेलरने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला आणि संघाचा डाव सावरला. टेलर बाद झाल्यावर निकोल्सनेही पाकिस्तानी गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. यादरम्यान, यासिर शाह निकोल्सला गोलंदाजी करताना वैतागला आणि त्याच्या तोंडातून “आऊट होजा भूतनी के!” असे शब्द बाहेर पडले. किवी फलंदाजांच्या चिवट खेळीपुढे दिवसभर गोलंदाजी करत असलेल्या यासिरची हतबलता या प्रसंगातून समोर आली. पहा व्हिडिओ:

दरम्यान, दुसऱ्या दिवशी निकोल्सने अर्धशतक ठोकले पण शतकी धावसंख्या गाठू शकला नाही आणि नसीम शाहच्या चेंडूवर 56 धावा करून परतला. या दरम्यान, कर्णधार विल्यम्सनने आपला शानदार फॉर्म कायम ठेवला आणि 23वे टेस्ट शतक करत 129 धावा केल्या. विल्यम्सनने  टेलरसह तिसऱ्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी केली. टेलर 151 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकार लगावत 70 धावा करून माघारी परतला.