NZ vs ENG Test 2019: पहिल्या टेस्टसाठी इंग्लंड-न्यूझीलंड संघ जाहीर; किवींनी लोकी फर्ग्यूसन याला वगळले, डोमिनिक सिबली करणार इंग्लंडसाठी डेब्यू 

21 ते 25 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी न्यूझीलंड आणि इंग्लंडने संघाची घोषणा केली आहे. यजमान न्यूझीलंडने लोकी फर्ग्युसन याच्याकडे दुर्लक्ष केले आहेत. यामुळे फर्ग्युसनची आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची प्रतीक्षा अजून वाढली आहे.

केन विल्यमसन आणि जो रूट (Photo Credit: Twitter/@Blackcaps)

5 सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर न्यूझीलंड (New Zeland) आणि इंग्लंड (England) संघात 2 सामन्यांच्या टेस्ट मालिकेत आमने-सामने येतील. 21 ते 25 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी न्यूझीलंड आणि इंग्लंडने संघाची घोषणा केली आहे. यजमान न्यूझीलंडने लोकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) याच्याकडे दुर्लक्ष केले आहेत. यामुळे फर्ग्युसनची आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची प्रतीक्षा अजून वाढली आहे. कर्णधार केन विल्यमसन याने बे ओव्हलमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टेस्ट मॅचसाठी टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट आणि नील वॅग्नर यांच्या प्रयत्नशील आणि अनुभवी कसोटी वेगवान त्रिकुटुळीसह खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मिशेल सॅटनर संघात एकमेव फिरकी गोलंदाज असेल. फर्ग्युसन पुढील आठवड्यात हॅमिल्टनच्या सेडॉन पार्कमध्ये होणाऱ्या दुसर्‍या मॅचमध्ये पदार्पण करू शकतो. इंग्लंडमधील विश्वचषकात दमदार कामगिरीनंतर 28 वर्षीय फर्ग्युसनला न्यूझीलंडच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळाले होते. (NZ vs ENG 5th T20I:  न्यूझीलंड-इंग्लंड संघात झाली विश्वचषकमधील सुपर-ओव्हरची पुनरावृत्ती, 'या' संघाने मारली बाजी)

दुसरीकडे डॉम सिब्ली (Dom Sibely) इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण जाणार आहे. बुधवारी झालेल्या अंतिम पत्रकार परिषदेत इंग्लंड कर्णधार जो रूट याने पहिल्या मॅचच्या प्लेयिंग इलेव्हनबद्दल काही भाष्य केले नाही, पण नंतर पुष्टी केली की मागील आठवड्यात वॉन्गेरीमध्ये झालेल्या तीन दिवसीय सराव सामन्याचा संघच पहिला टेस्ट खेळेल. याचा अर्थ की रोरी बर्न्स याच्यासहसिब्ली इंग्लंडच्या डावाची सुरुवात करेल. अ‍ॅशेस मालिकेत बर्न्ससह सलामीला आलेला जो डेन्ली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल आणि कर्णधार रूट पसंतीच्या चौथ्या स्थानावर फलंदाजी करेल.

दरम्यान, यापूर्वी टी-20 मालिकेत दोन्ही संघात चांगली लढत पाहायला मिळाली. आणि अखेरीस इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-2 ने विजय मिळवला. आता इंग्लंड किवींविरुद्ध विजय रथ कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल.

न्यूझीलंड आणि इंग्लंड संघ खालीलप्रमाणे आहे:

न्यूझीलंडः टॉम लाथम, जीत रावल, केन विल्यमसन (कॅप्टन), रॉस टेलर, हेनरी निकॉल्स, बीजे वॅटलिंग, कोलिन डी ग्रैंडहोम, मिशेल सॅटनर, टिम साउथी, नील वॅग्नर, ट्रेंट बोल्ट.

इंग्लंड: जो बर्न्स, डोम सिब्ली, जो डेन्ली, जो रूट (कॅप्टन), बेन स्टोक्स, ओली पोप, जोस बटलर, सॅम कुरन, जॅक लीच, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड.



संबंधित बातम्या