ICC ने शेअर केला रवि शास्त्री यांचा मजेदार फोटो, Netizens ने मजेदार प्रतिक्रिया देत लुटला आनंद, पहा Tweets
शास्त्रींच्या या फोटोला आयसीसीने नेटकऱ्यांना कॅप्शन देण्यास सांगितले. आणि सोशल मीडियावर चाहत्यांनी याचा भरपूर फायदा घेतला आणि टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्या दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. भारताने आफ्रिकेला फॉलोऑन दिला आहे. पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या संघाला 275 धावांवर बाद केले आणि 326 धावांची आघाडी मिळवली. या मॅचआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, आयसीसीने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांचा एक फोटो केला. शास्त्रींच्या या फोटोवर पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोलचा जोर धरला आहे. टीम इंडियाने (Indian Team) दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दुसऱ्या टेस्टमध्ये प्रभावी खेळाचे प्रदर्शन केले आहे. आणि त्यामुळे, टीम इंडिया सामना आणि मालिका जिंकण्याच्या जवळ पोहचली आहे. आयसीसी विश्वचषकनंतर शास्त्रींना अलीकडेच टीम इंडियाचे प्रशिक्षकपदी पुन्हा निवडले गेले. (रवि शास्त्री यांनी गांधी जयंतीच्या दिल्या शुभेच्छा, Netizens ने Dry Day ची आठवण करून देत घेतली फिरकी, पहा Tweets)
शास्त्रींच्या या फोटोला आयसीसीने नेटकऱ्यांना कॅप्शन देण्यास सांगितले. आणि सोशल मीडियावर चाहत्यांनी याचा भरपूर फायदा घेतला आणि टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. शास्त्रींनाचा हा फोटो पोस्ट करणे आयसीसी आणि स्वतः रवींना महाग पडले कारण ते पुन्हा एकदा ट्रॉलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. शास्त्रींच्या या फोटोवर नेटिझन्सने अत्यंत मजेदार अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने तर चक्क रवींना आयर्न मॅनचा संदर्भ लावला. पहा इथे:
आयसीसी ट्विट
आमच्या आयर्नमॅनला कॉपी करण्याचा प्रयत्न करीत आहे
आज रविवार आहे, मग तो मद्यपान करण्याचा दिवस आहे
माझी बेली पहा...
"मयांक या बाजूस व्हिस्कीच्या 2 बाटल्या आणेल आणि रोहित त्या बाजूला वोडकाच्या 3 बाटल्या आणेल. चला! सराव सुरू करा!"
विराट: रवि भाई, काल किती दारू प्यालात?
रवी शास्त्री:
दुसरीकडे, शास्त्रींनीं वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यानदेखील अशाच पोजमध्ये ट्विटरवर फोटो शेअर केला होता. पण, त्यावेळी शास्त्रींना त्याच्या फिटनेसवरून ट्रोल केले गेले होते. दरम्यान, टीम इंडियाबद्दल बोलले तर, सध्या दक्षिण आफ्रिकाविरुद्ध संघाने 3 सामन्यांच्या टेस्ट मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. सध्या सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताने आफ्रिकेला फॉलोऑन दिला आहे. आणि सुरुवातीलाच संघाला मोठा धक्का बसला. सलामी फलंदाज एडन मार्क्रम शून्यावर बाद झाला. यापूर्वी, दोन्ही संघातील टी-20 मालिका 1-1 ने ड्रॉ झाली होती.