आजवर आपण सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग, ब्रायन लारा, विव्ह रिचर्ड्स यांसारख्या महान खेळाडूंना वनडे क्रिकेट खेळताना पाहिले आहे. यंदाच्या काळात, विराट कोहली (Virat Kohli), बाबर आझम (Babar Azam) हे 50 ओव्हर क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे हे वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट सरासरीचा विक्रम करणारा यापैकी कोणी नव्हे तर नेदरलँड्सचा (Netherland) रेयान टेन डोस्चैट (Ryan ten Doeschate) आहे. आयपील खेळणारा नेदरलँड्सच्या या क्रिकेटपटूने 33 पाकी 32 सामन्यात 67.00 च्या सरासरीने 1541 धावा फटकावल्या. वनडे सामन्यात किमान 1000 धावा करत सर्वाधिक सरासरी नोंदवण्याचा विक्रम रियानच्या नावावर आहे. या विशिष्ट यादीमध्ये भारताचा विराट कोहली दुसर्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तानी बाबर आझम तिसर्या क्रमांकावर आहे. (IND vs SA 1st Test 2019: पहिल्या टेस्टआधी विराट कोहली ने घेतली खास चाहत्यांची भेट, अंगावर गोंदवले कोहलीसंबंधीचे 15 टॅटू)
सोशल मीडियावरील आपला हा रेकॉर्ड पाहिल्यानंतर, रायन थोडा गोंधळलेला दिसला आणि त्याने त्या यादीमध्ये येणाऱ्यांची क्षमा मागितली. ईएसपीएनक्रिकइन्फो यांनी केलेल्या ग्राफिक्स पोस्टला प्रतिसाद देत रयानने हास्यास्पद उत्तर दिले. श्रीलंकेचा क्रिकेटपटू दिलशान मुनवीराने त्याच्या प्रतिसादाबद्दल डच स्टारचे कौतुक केले आणि त्याने लिहिले: “Goat”. वनडे क्रिकेटमध्ये यंदाच्या काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जाणारा कोहली या यादीत रायनच्या मागे आहे. भारतीय कर्णधाराने 60.31 च्या सरासरीने 11520 धावा केल्या आहेत.
Apologies to all involved.
— Ryan ten Doeschate (@rtendo27) October 1, 2019
दिलशान मुनवीरा
👏 GOAT
— Dilshan Munaweera (@dilshanSD24) October 1, 2019
दरम्यान, रायनने 33 वनडे सामन्यांमध्ये नेदरलँड्सचे प्रतिनिधित्व केले असून त्याने 67 च्या सरासरीने 1541 धावा केल्या आहेत. रायनने वनडेमध्ये 5 शतक केले आहेत त्यातील दोन त्याने 2011 च्या विश्वचषकात केले आहेत. 2011 आणि 2015 या पाच मोसमात त्याने आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले आहे. रायनने नुकतेच तीन वर्षांत एसेक्स संघाला दुसरे इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आणि टी-20 ब्लास्टचे पहिले विजेतेपद जिंकण्यास सहाय्य केले.