Mushfiqur Rahim Century: मुशफिकुर रहीमने पाकिस्तानविरुद्ध झळकावले पहिले शतक, अनेक विक्रमांना घातली गवसनी
त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे 11वे शतक आहे. त्याच्या कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले आहे.
Pakistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan National Cricket Team) आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मुशफिकुर रहीमने (Mushfiqur Rahim) शानदार शतकी खेळी (191) खेळली आहे. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे 11वे शतक आहे. त्याच्या कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले आहे. यापूर्वी त्याची सर्वोत्तम धावसंख्या 91 धावा होती. रहिमने बांगलादेशचा डाव अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला. अशा परिस्थितीत त्याच्या खेळीमुळे त्याने आपल्या नावावर भीम पराक्रम केला आहे. (हे देखील वाचा: Pakistan vs Bangladesh 1st Test Day 4 Scorecard: बांगलादेशचा पहिला डाव 565 धावांवर मर्यादित, मुशफिकुर रहीमचे द्विशतक हुकले; येथे पाहा स्कोअरकार्ड)
परदेशी भूमीवर कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक 5 शतके
बांगलादेश क्रिकेट संघाचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने इतिहास रचला आहे. आपल्या संघाच्या वतीने, तो परदेशी भूमीवर कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी हा खास विक्रम तमीम इक्बालच्या नावावर होता, मात्र रहिमने आता रावळपिंडी कसोटीच्या पहिल्या डावात शतक झळकावून ही खास कामगिरी आपल्या नावावर केली आहे. त्याच्या नावावर आता बांगलादेशसाठी परदेशी भूमीवर कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक 5 शतके झळकावण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे.
बांगलादेशसाठी कसोटीत सर्वाधिक धावा
रहिम हा बांगलादेशकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून 5,867 धावा झाल्या आहेत. दुस-या स्थानावर तमीम इक्बाल आहे, ज्याने 70 कसोटी सामन्यांच्या 134 डावात 5,134 धावा केल्या आहेत आणि दोनदा नाबाद राहिले आहेत. त्याची सरासरी 38.89 आहे. 11 शतकांसह रहीम आता बांगलादेशसाठी कसोटीत सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. मोमिनुल हक (12) पहिल्या स्थानावर आहे.
1,5000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या
या खेळीदरम्यान रहीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15,000 धावाही पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो बांगलादेशचा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी फक्त तमिमनेच ही कामगिरी केली होती. तमिमने 387 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 448 डावांमध्ये 15,192 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या बॅटने 25 शतके आणि 94 अर्धशतके केली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 206 धावा आहे. रहीमने आपल्या 462 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 15000 धावा पूर्ण केल्या.
रहिमची कारकीर्द
37 वर्षीय रहीमने 2005 मध्ये इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. या खेळाडूने 89 कसोटी सामन्यांच्या 164 डावांमध्ये 14 वेळा नाबाद राहताना 5,867 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 39.11 आहे. त्याने 11 शतके, 3 द्विशतके आणि 27 अर्धशतके केली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये या खेळाडूची सर्वोत्तम धावसंख्या 219 धावा आहे.