Rohit Sharma's Video with Daughter: रोहित शर्मा चा मुलगी समायरा सोबत खेळतानाचा क्युट व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

या व्हिडिओत रोहित शर्मा, मुलगी समायरा शर्मा सोबत खेळताना दिसत आहे. पहा त्यांचा क्युट व्हिडिओ...

Rohit Sharma with daughter Samaira Sharma (Photo Credits: Instagram/mumbaiindians)

IPL 2020: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा कर्णदार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने इंस्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रोहित शर्मा, मुलगी समायरा शर्मा (Samaira Sharma) सोबत खेळताना दिसत आहे. समायरा आपल्या वडीलांचा म्हणजेच रोहित शर्माचा हात पकडून चक्क गोल गोल फिरत आहे. उड्या मारत असल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे. रोहित शर्मा याने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत यांसारखे काही छोटे आनंदी क्षण.

इंडियन प्रीमियर लीगच्या  (Indian Premier League) 13 व्या सीजनसाठी रोहित शर्मा सध्या आपल्य टीमसोबत दुबईत (UAE) आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) आणि मुलगी समायरा शर्मा देखील दुबईत आहेत. दरम्यान रोहित शर्मा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून नेहमीच रितिका-समायरा सोबतचे खास क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. यापूर्वीही त्याने समायरा सोबतचे क्युट व्हिडिओज शेअर करुन चाहत्यांना आनंदीत केले आहे. (रोहित शर्माचे नेट सत्रात दिग्विजय देशमुखला मिळाले मार्गदर्शन, मुंबई इंडियन्स कर्णधाराच्या एका सल्ल्याने पाहा काय घडले, Watch Video)

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

Cute little moments like these!👨‍👧💙 #OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL #ReelItFeelIt #ReelKaroFeelKaro @rohitsharma45

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians) on

19 सप्टेंबर पासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. आयपीएल 2020 चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. (IPL's Most Successful Captains: महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली की रोहित शर्मा? आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार)

रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने चार वेळा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. यंदाही आयपीएल विजेता होण्यासाठी मुंबई इंडियन्स पूर्णपणे प्रयत्न करतील. रोहित शर्मा याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 188 सामने खेळले आहेत. त्यात 183 इनिंग्समध्ये एकूण 4898 धावा केल्या असून एक शतक आणि 36 अर्धशतकांची आपल्या नावावर नोंद केली आहे.