Pakistan vs England 1st Test 2024 Live Streaming: मुलतान कसोटीला आजपासुन सुरुवात, पाकिस्तान-इंग्लडं आमनेसामने; कोणत्या ओटीटीवर पाहणार लाइव्ह?
पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघांचे प्लेइंग 11 जाहीर करण्यात आले आहेत. पाकिस्तान संघाची कमान शान मसूदच्या हाती आहे. तर ओली पोप इंग्लंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan National Cricket Team) विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुलतानच्या मुलतान क्रिकेट स्टेडियमवर (Multan Cricket Stadium) सकाळी 10.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघांचे प्लेइंग 11 जाहीर करण्यात आले आहेत. पाकिस्तान संघाची कमान शान मसूदच्या हाती आहे. तर ओली पोप इंग्लंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
कधी अन् कुठे पाहणार सामना?
भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनलवर पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण होणार नाही. तथापि, फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना येथून पहिल्या कसोटी सामन्याचा आनंद घेता येईल. (हे देखील वाचा: Pakistan vs England 1s Test Pitch Report And Weather Forecast: मुलतानच्या मैदानावर गोलंदाज की फलंदाज कोण गाजवणार वर्चस्व? जाणून घ्या खेळपट्टी आणि हवामान अहवाल)
दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
पाकिस्तान : सईम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद.
इंग्लंड : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (सी), जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, जॅक लीच, शोएब बशीर.