IPL: सूर्यकुमार यादवच्या सर्वकालीन आयपीएल XI मधून MS Dhoni याला डच्चू, तर स्टार फलंदाज David Warner ‘या’ कारणामुळे झाला अवाक
मुंबई इंडियन्सचा स्टार नंबर-3 फलंदाज सूर्यकुमार यादवने आपली आयपीएलची ऑल-टाइम इलेव्हन निवडली. यादवने सर्वांना चकित करत यामध्ये राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला विकेटकीपर म्हणून निवडले तर एमएस धोनीला डच्चू दिला आहे.Cricbuzz वर हर्षा भोगले यांच्याशी संवाद साधताना सूर्यकुमारला टी -20 लीगमधून त्यांची अष्टपैलू इलेव्हन निवडण्यास सांगण्यात आले होते.
Suryakumar Yadav All-time IPL Playing XI: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार नंबर-3 फलंदाज सूर्यकुमार यादवने (Surykumar Yadav) आपली आयपीएलची (IPL) ऑल-टाइम इलेव्हन निवडली. यादवने सर्वांना चकित करत यामध्ये राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला विकेटकीपर म्हणून निवडले तर एमएस धोनीला (MS Dhoni) डच्चू दिला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) मुंबई इंडियन्सने सलग दोन विजेतेपदासह पाच चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत परंतु चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विजयी टक्केवारीनुसार अद्यापही अव्वल स्थानावर आहे. Cricbuzz वर हर्षा भोगले यांच्याशी संवाद साधताना सूर्यकुमारला टी -20 लीगमधून त्यांची अष्टपैलू इलेव्हन निवडण्यास सांगण्यात आले होते पण दोन अटींसह. पहिली अट अशी होती की त्याने स्वत: ला इलेव्हनमध्ये निवडावे आणि दुसरी म्हणजे प्लेइंग इलेव्हनमध्ये कमीतकमी चार मुंबई इंडियन्स खेळाडू असायला हवेत. (सूर्यकुमार यादव म्हणतो Virat Kohli नव्हे तर ‘हा’ खेळाडू आहे सर्वोत्कृष्ट कर्णधार, दिले ‘हे’ मोठे कारण)
फलंदाजीच्या क्रमवारीत सूर्यकुमारने राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) निवड केली. बटलरच्या समावेशामुळे विकेटकीपरची जागाही सूर्याच्या इलेव्हनमध्ये भरली होती त्यामुळे धोनीला संधी मिळाली नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कर्णधार विराट कोहली तिसर्या क्रमांकावर आहे तर सूर्यकुमारने स्वत:ला चौथ्या स्थानावर ठेवले. ऑलटाइम इलेव्हनमध्ये आरसीबीच्या एबी डिव्हिलियर्सला यादवने स्थान दिले. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार सर्वात सामर्थ्यवान कामगिरी करणारा खेळाडू आहे. इतकंच नाही तर सूर्यकुमारने निवडलेला प्लेइंग इलेव्हन पाहून टूर्नामेंटमध्ये आजवर सर्वाधिक धावा करणारा विदेशी खेळाडू डेविड वॉर्नर अवाक झाला आणि एक भन्नाट प्रतिक्रिया दिली.
दुसरीकडे, सूर्यकुमारने अष्टपैलू म्हणून - मुंबई इंडियन्सचे हार्दिक पांड्या, कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल आणि चेन्नई सुपर किंग्जचा रवींद्र जडेजा अशा एकूण तीन अष्टपैलू खेळाडूंची निवड केली. हार्दिक आणि आंद्रे हे वेगवान गोलंदाज अष्टपैलू आहेत तर जडेजा एकमेव फिरकी गोलंदाज अष्टपैलू आहे. टी-20 क्रिकेटमधील नंबर- 1 गोलंदाज फिरकीपटू रशिद खान यादीत पुढे आहे. गेल्या काही वर्षांत राशिद टी-20 लीगमधील सर्वात प्रभावी स्पिनर ठरला आहे. त्याच्याविरूद्ध धावा करणे अद्याप फलंदाजांसाठी सर्वात अवघड काम आहे. सूर्याने अखेरच्या दोन जागांसाठी मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह आणि पंजाब किंग्जच्या मोहम्मद शमीची निवड केली.
सूर्यकुमार यादवचा इलेव्हन पाहा: जोस बटलर (विकेटकीपर), रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एबी डिव्हिलियर्स, हार्दिक पांड्या, आंद्रे रसेल, रवी जडेजा, राशिद खान, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)