Michael Vaughan यांनी अहमदाबाद पीचवरून ICC वर टीका म्हणाले- ‘भारताला जोपर्यंत सूट मिळत राहील तोवर ICCची स्थिती दात नसलेल्या श्वापदासारखी असेल’
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसर्या पिंक-बॉल टेस्ट सामन्याचा निकाल अवघ्या दोन दिवसात लागला ज्यामुळे मोटेरा खेळपट्टीवर व्यापक टीका करण्यात आली.
IND vs ENG Test Series 2021: कसोटी क्रिकेटसाठी अनुकूल खेळपट्ट्या निर्माण न केल्याबद्दल बीसीसीआयची (BCCI) टीका करताना इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॅन (Michael Vaughan) म्हणाले की, ‘भारताला जोपर्यंत सूट मिळत राहील’ तितकीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (International Cricket Council)) कुचकामी दिसेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसर्या पिंक-बॉल टेस्ट (Pink-Ball Test) सामन्याचा निकाल अवघ्या दोन दिवसात लागला ज्यामुळे मोटेरा खेळपट्टीवर व्यापक टीका करण्यात आली. बर्याच माजी क्रिकेटपटूंनी या खेळपट्टीचा बचाव केला तर इंग्लंडच्या (England) बऱ्याच माजी खेळाडूंनी दोन दिवसांच्या कालावधीत 30 विकेट्स पडलेल्या खेळपट्टीच्या प्रकारावर टीका केली आहे. माइकल वॉन, डेविड लॉईड, अॅलिस्टर कुक, केविन पीटरसन आणि इतरांनी या खेळपट्टीवर कडक टीका केली तर वॅनने एक पाऊल पुढे जात आयसीसीवर निशाणा साधला आणि आणि भारताच्या विजयाबद्दल महत्त्वाचे विधान केले. (Ahmedabad Pitch Controversy: मोटेरा पीचबाबत विराट कोहलीच्या विधानावर Alastair Cook याचा पालटवार, केली कडक टीका)
“भारतासारख्या बलाढ्य देशांना जोपर्यंत आयसीसीकडून सूट मिळत राहील तोवर त्यांची अवस्था दात नसलेल्या श्वापदासारखी असेल,”वॉनने डेली टेलीग्राफमध्ये लिहिले. बीसीसीआयवर निराशा व्यक्त करताना पुढे त्यांनी म्हटले की, “प्रशासकीय मंडळ भारताला त्यांच्या इच्छेनुसार खेळपट्ट्या तयार करून घेत आहे पण त्यामुळे कसोटी क्रिकेटला त्रास होतोय.” “भारताने तिसरी कसोटी जिंकली, पण तो उथळ विजय होता. कारण त्या सामन्यात खेळ जिंकला नाही,” अशा शब्दात वॉनने आपल्या कॉलमची सुरूवात केली. भारताने इंग्लंडपेक्षा चांगली कामगिरी केली आणि सामना जिंकला. पण, कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने असे सामने फारसे योग्य नाहीत आणि आमच्यासारख्या माजी खेळाडूंनी याविरोधात आवाज उठवणे हे आमचं कर्तव्य आहे,” असं रोखठोक मत वॉन याने मांडले. वॉनने आयसीसी आणि बीसीसीआयवर दोष लगावला, पण हे लक्षात घेतले पाहिजे की बर्याच सरळ चेंडूमुळे फलंदाज बाद झाले.
अहमदाबादच्या तिसर्या कसोटी सामन्यातील खेळपट्टीचा गुणवत्तेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असल्या तरी नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्याने खेळाची पातळीवर वाढली असून सध्या चार सामन्यांच्या मालिकेत यजमान संघ 2-1 अशा बरोबरीत आहे. चौथ्या आणि शेवटच्या कसोटीचे आयोजनही त्याच ठिकाणी होणार आहे आणि अलिकडच्या काळात मोटेराच्या खेळपट्टीवर टीका झाल्यानंतर क्युरेटर्स कोणत्या प्रकारची खेळपट्टी बनवतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.