क्रिकेटर मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचा काँग्रेसमध्ये प्रवेश

हसीनने मुंबई काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

मोहम्मद शमीच्या पत्नीचा काँग्रेस पक्षात प्रवेश (Photo credits: Twitter)

भारतीय टीमचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हसीनने मुंबई काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

मोहम्मद शमीसोबतच्या वादानंतर हसीन जहाँ चांगलीच चर्चेत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार,आगामी विधानसभा निवडणूकीत काँग्रेसला यश मिळवून देण्यासाठी हसीन पाच राज्यात प्रचार करु शकते.

हसीनने शमीविरोधात 8 मार्चला जाधवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पाकिस्तानी महिलेकडून पैसे घेणे, मॅच फिक्सिंग, मुलींशी अनैतिक संबंध असे आरोप हसीनने शमीवर लावले आहेत. परंतु, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या भ्रष्टाचार रोधी समितीने (सीओए) शमी निर्दोष असल्याचे सांगितले आहे.

अलिकडेच कोर्टाच्या निर्णयाने शमीची पत्नी हसीन जहाँला झटका बसला आहे. खरंतर हसीनने मुलीच्या खर्चासाठी शमीकडून दरमहा 10 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र कोर्टाने त्यास नकार दिला. त्याऐवजी  दरमहा 80 हजार देण्याचा आदेश कोर्टाने शमीला दिला आहे.

हसीन जहाँनुसार मोहम्मद शमीचे लग्नानंतरही अनेक मुलींसोबत अनैतिक संबंध होते. त्यास विरोध केला असता शमीने मारहाण केल्याचे हसीनने म्हणणे आहे. तसंच शमीचे कुटुंबिय तिला ठार मारणार असल्याचे सांगून तिने शमीसोबत न राहण्याचा निर्णय घेतला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

ZIM vs IRE Only Test 2025 Day 2 Live Streaming: झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड एकमात्र कसोटी सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ रोमहर्षक ठरणार, जाणून घ्या केव्हा, कुठे आणि कसे पहायचे थेट प्रक्षेपण

Johnathan Campbell Debut: क्रिकेटच्या मैदानावर घडली एक अनोखी घटना, पदार्पणाच्या सामन्यातच खेळाडूला मिळाले संघाचे कर्णधारपद

IND Beat ENG 1st ODI Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय, गोलंदाजांनंतर श्रेयस-शुभमन आणि अक्षर पटेल चमकले

Zimbabwe vs Ireland, Only Test Day 1 Scorecard: आयर्लंडचा पहिला डाव 260 धावांवर आटोपला, मार्क अडायर आणि अँडी मॅकब्राइन यांनी झळकावली अर्धशतके; येथ पाहा स्कोअरकार्ड

Share Now