MI vs SRH, IPL 2020: सुपरमॅन-ईश! मनीष पांडेच्या डायविंग कॅच वर नेटकरी फिदा, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिली अशी प्रतिक्रिया (Watch Video)

अशाप्रकारे मुंबईचा घातक फलंदाज किशन आज 31 धावा करून माघारी परतला. दरम्यान, मनीषचा हा कॅच पाहून सोशल मीडियावर चाहतेच नाही तर दिग्गज देखील प्रभावित झाले.

मनीष पांडेचा डायविंग कॅच (Photo Credit: Twitter)

शारजाह येथे रविवारी आयपीएल (IPL) 2020 च्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) फलंदाज इशान किशनला (Ishan Kishan) माघारी पाठवण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) मनीष पांडेने (Manish Pandey) जबरदस्त डाइव्हिंग कॅचला पकडला. मनीषला आजच्या हैदराबादच्या सामन्यात सुरुवातील फिल्डिंग दरम्यान संघर्ष करावे लागले. संदीप शर्माच्या 15 व्या ओव्हरच्या एका चेंडूवर मनीषने हार्दिक पांड्याचा झेल सोडले जेणेकरून मुंबई इंडियन्सला चार धावा मिळाल्या, पण त्याच ओव्हरच्या नंतरच्या चेंडूवर इशांतने मोठा फटका मारला जो त्याच्या बॅटवर नीट बसला नाही आणि चेंडू सीमारेषेच्या आत पडत असताना मनीषने बाउंड्री लाईनवर जबरदस्त उडी मारली आणि कॅच पकडला. अशाप्रकारे मुंबईचा घातक फलंदाज किशन आज 31 धावा करून माघारी परतला. (MI vs SRH, IPL 2020: क्विंटन डी कॉकचे तुफान अर्धशतक, कीरोन पोलार्ड-हार्दिक पांड्याच्या 'पॉवर-हिटिंग'ने SRHसमोर 209 धावांचे आव्हान)

दरम्यान, मनीषचा हा कॅच पाहून सोशल मीडियावर चाहतेच नाही तर दिग्गज देखील प्रभावित झाले. सचिन तेंडुलकर, जीवन मेंडिस यांनी मनीषने घेतलेला कॅच पाहून अशा प्रतिक्रिया दिल्या. पाहा मनीषने घेतलेला सुपरमॅन कॅच...

सुपरमॅन-ईश

सचिन तेंडुलकर प्रभावित!!

अ‍ॅथलेटिक !!

जीवन मेंडिस

मिम्स!!

जबरदस्त

सुपर कॅच !!

दरम्यान, आजच्या सामन्यात पहिले फलंदाजी करून 208 धावा केल्या आणि हैदराबादसमोर 209 धावांचे आव्हान दिले. क्विंटन डी कॉकने 67 धावा केल्या. ईशान किशन 31, सूर्यकुमार यादवने 27 धावा केल्या. कीरोन पोलार्ड आणि हार्दिक पांड्याच्या जोडीने मोठे फटके मारले आणि टीमला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. पोलार्ड 25 आणि कृणाल पांड्या 20 धावा करून नाबाद परतले. हार्दिक 28 धावा करून बाद झाला. आजच्या सामन्यासाठी मुंबईने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही तर हैदराबादने भुवनेश्वर कुमार आणि खालील अहमदच्या जागी अनुक्रमे संदीप शर्मा आणि सिद्धार्थ कौलला संधी दिली.