MI vs SRH, IPL 2020 Live Streaming: मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी अशा स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर लाईव्ह प्रसारित केला जाईल.
MI vs SRH, IPL 2020 Live Streaming: इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 च्या दुसऱ्या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderbad) आमने-सामने येतील. या सामन्यात दोन्ही संघांची नजर सलग दुसर्या विजयाकडे असेल. हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) खेळला जाईल जिथे आतापर्यंत अनेक धावा बनल्या आहेत, त्यामुळे आजच्या सामन्यात देखील पुन्हा एकदा चौकार-षटकारांचा पाऊस पडताना दिसू शकतो. सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता होईल. टॉस अर्धातास आधी म्हणजे 3:00 वाजता होईल. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी अशा स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर लाईव्ह प्रसारित केला जाईल. शिवाय, सामन्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीम हॉटस्टारवर उपलब्ध असेल. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020 Points Table Updated: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची ‘गरुडझेप’, Points Tableमध्ये मिळवलं अव्वल स्थान)
स्फोटक फलंदाज आणि उत्कृष्ट डेथ गोलंदाजांच्या उपस्थितीने सनरायझर्स हैदराबादच्या आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा वरचष्मा असेल. मुख्य वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीमुळे सनरायझर्सची डोकेदुखी वाढली आहे. शिवाय, आगामी सामन्यांमध्ये त्याची खेळण्याची शंका आहे. त्यांची फलंदाजीची कमजोर दिसत आहे. दुसरीकडे, मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने चार सामन्यात 170 धावा केल्या असून तो शानदार लयीत आहे. कोणतीही गोलंदाजावर भारी पडू शकतो. पण मुंबईसाठी सलामी फलंदाज क्विंटन डी कॉकचा फॉर्म मोठी डोकेदुखी आहे, पण त्यांची मधली फळी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
पाहा मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ:
मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा (कॅप्टन), आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, अनुकुल रॉय, क्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, मिशेल मॅकक्लेनाघन, मोहसिन खान, नॅथन कोल्टर-नाईल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट.
सनरायझर्स हैदराबाद संघ: डेविड वॉर्नर (कॅप्टन), अभिषेक शर्मा, बासिल थंपी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टानलेक, जॉनी बेयरेस्टो, केन विल्यमसन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, रशीद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर, रिद्धिमान साहा, विराट सिंह, प्रियम गर्ग, मिशेल मार्श, संदीप बावनका, फॅबियन अॅलेन, अब्दुल समद, संजय यादव.