MI vs RCB IPL 2021 Match 1: AB de Villiers याचा तडाखा! मुंबईची परंपरा कायम; रॉयल चॅलेंजर्सचा रोमांचक सामन्यात 2 विकेटने निसटता विजय

एबी डिव्हिलियर्सने सर्वाधिक 48 धावा करत संघाचा विजय निश्चित केला.

एबी डिव्हिलियर्स (Photo Credit: Twitter/IPL)

MI vs RCB IPL 2021 Match 1: आयपीएल (IPL) गेतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाविरुद्ध अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात इंडियन प्रीमियर लीग (Indian Primiear League) 2021 सलामीच्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने 2 विकेटने दणदणीत विजय मिळवला आणि हंगामाची विजयी सुरुवात केली. एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) सर्वाधिक 48 धावा करत संघाचा विजय निश्चित केला. कर्णधार विराट कोहलीने 33 धावा तर ग्लेन मॅक्सवेलने 39 धावांचे योगदान दिले. चेपॉक स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात पराभवासह आयपीएलमधील मुंबईच्या पहिल्या सामन्यातील पराभवाची मालिका देखील सुरूच राहिली. 2013 पासून मुंबईला आयपीएलच्या आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. ‘पलटन’कडून ट्रेंट बोल्ट आणि कृणाल पांड्या प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (MI vs RCB IPL 2021: Mumbai Indians संघाविरुद्ध आयपीएलमध्ये 5 विकेट घेणारा Harshal Patel ठरला पहिला गोलंदाज)

मुंबईने दिलेल्या 160 धावांच्या माफक धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या आरसीबीला एकूण 36 धावसंख्येवर पहिला धक्का बसला. आरसीबीने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केल्यामुळे यंदा कर्णधार विराट आणि वॉशिंग्टन सुंदरची नवीन सलामी जोडी संघासाठी मैदानात उतरतली होती. सुंदरला दुसऱ्याच चेंडूवर जीवदान मिळाले होते, पण सुंदर त्याचा फायदा करू घेऊ शकला नाही. कृणालने बेंगलोरला पहिला झटका दिला आणि सुंदरला 10 धावांवर क्रिस लिनच्या हाती कॅच आऊट केलं. यानंतर बोल्टने रॉयल चॅलेंजर्सना दुसरा झटका दिला. बोल्टने पदार्पणवीर रजत पाटीदारला 8 धावांवर क्लिन बोल्ड करत पॅव्हिलियनमध्ये धाडलं. मात्र, विराट आणि मॅक्सवेलच्या जोडीपुढे मुंबई गोलंदाजांनी शरणागती पत्करली. दोन्ही धाकड फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाला विजयीरेष ओलांडून दिली. या दरम्यान विराटने आयपीएल करिअरमधील आपले 40वे अर्धशतक ठोकले.

यापूर्वी, टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या मुंबईकडून क्रिस लिनने सर्वाधिक 49 धावा केल्या, तर बेंगलोरकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे गेतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध आयपीएलमध्ये पाच विकेट घेणारा हर्षल पहिला गोलंदाज ठरला आहे.