MI vs RCB, IPL 2020 Live Streaming: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर

या सामन्यासह एमआय आणि आरसीबी प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित करण्याच्या निर्धारित असतील. भारतातील प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. या सामन्याचे लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग डिस्नी+ हॉटस्टार अ‍ॅपवर पाहण्यास उपलब्ध असेल.

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: File Image)

MI vs RCB, IPL 2020 Live Streaming: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) बुधवारी 28 ऑक्टोबर रोजी आयपीएलच्या (IPL) गुणतालिकेतील पहिल्या दोन संघात प्ले ऑफसाठीची लढत पाहायला मिळणार आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात आज अबू धाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर आजचा सामना रंगणार आहे. या सामन्यासह एमआय (MI) आणि आरसीबी (RCB) प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित करण्याच्या निर्धारित असतील. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्याही आयपीएलचा 48वा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल, तर टॉस अर्धातास पूर्वी म्हणजे 7:00 वाजता होईल. भारतातील प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. शिवाय, या सामन्याचे लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग डिस्नी+ हॉटस्टार अ‍ॅपवर पाहण्यास उपलब्ध असेल. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत. ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात.

दरम्यान, मुंबई सध्या 14 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये अव्वल आहेत, तर मागील सामन्यात त्यांचा राजस्थान रॉयल्सकडून 8 विकेटने एकतर्फी पराभव झाला होता. मुंबईप्रमाणे आरसीबीचे देखील 14 गुण आहेत, मात्र ते निव्वळ नेट रनरेटने मुंबईच्या मागे आहेत. मुंबईप्रमाणेच मागील सामन्यात स्पर्धेतून बाहेर पडलेल्या चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध आरसीबीला 8 विकेटने पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे, आरसीबीविरुद्ध आजच्या सामन्यात मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्मा उपलब्ध असेल की नाही यावर संभ्रम कायम आहे. रोहितला हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे मागील दोन सामन्यांना मुकावे लागले होते, आणि जर यंदाही रोहित खेळण्यास सक्षम नसल्यास त्याच्या जागी किरोन पोलार्ड संघाचे नेतृत्व करू शकतो.

पाहा एमआय आणि आरसीबी संघ

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कॅप्टन), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकुल रॉय, क्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, मिशेल मॅकक्लेनाघन, मोहसिन खान, नॅथन कोल्टर-नाईल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डिकॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर:  आरोन फिंच, देवदत्त पडिक्कल, पार्थिव पटेल, विराट कोहली (कॅप्टन), एबी डिविलियर्स, गुरकीरत सिंह, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, अ‍ॅडम झांपा, ईसूरु उदाना, मोईन अली, जोश फिलिप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, उमेश यादव.