MI vs CSK IPL 2020: अंबाती रायुडू, फाफ डु प्लेसिसच्या अर्धशतकाने चेन्नई सुपर किंग्सचा एकहाती विजय, मुंबई इंडियन्स 5 विकेट पराभूत

पहिले फलंदाजी करून सीएसकेला दिलेल्या 163 धावांचे लक्ष्य एमएस धोनीच्या 'येलो आर्मी' सहजपणे 5 विकेटने गाठले. सीएसकेकडून अंबाती रायुडूने सर्वाधिक 71 धावा केल्या, फाफ डु प्लेसिस 54 आणि सॅम कुर्रानने 18 धावा केल्या.

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

आयपीएल (IPL) 13 च्या सलामीच्या सामन्यात गतजेता मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पराभवाचा सामना करावा लागला. पहिले फलंदाजी करून चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) दिलेल्या 163 धावांचे लक्ष्य एमएस धोनीच्या 'येलो आर्मी' सहजपणे 5 विकेटने गाठले. सीएसकेसाठी (CSK) एमएस धोनीने (MS Dhoni) टॉस जिंकला आणि मुंबईला पहिले फलंदाजीसाठी बोलावले. मुंबईने साजेशी सुरुवात केली, पण सौरभ तिवारीला (Saurabh Tiwary) वगळता एकही फलंदाज सीएसके गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. मुंबई इंडियन्सने निर्णधारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 162  धावा केल्या. मुंबईने दिलेले सीएसकेने लक्ष्य सहजपणे गाठले आणि विजयासह हंगामाची सुरुवात केली. सीएसकेकडून अंबाती रायुडूने (Ambati Rayudu) सर्वाधिक 71 धावा केल्या, फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) 54 आणि सॅम कुर्रानने (Sam Curran) 18 धावा केल्या. रायडूच्या या खेळीच्या जोरावर चेन्नईने सामना जिंकला. मुंबईकडून ट्रेंड बोल्ट, जसप्रीत बुमराह, जेम्स पॅटिन्सन, कृणाल पांड्या आणि राहुल चाहरने प्रत्येकी 1 विकेट घेतली. (MI vs CSK IPL 2020: फाफ डु प्लेसिसने एकाच ओव्हरमध्ये पकडले दोन अफलातून कॅच, पाहून तुम्ही देखील व्हाल चकित Watch Video)

चेन्नईकडून लूंगी नग्धीनं तीन विकेट घेतल्या. तर राहुल चाहर आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. फाफने 42 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पहिल्या दोन ओव्हरमध्येच दोन विकेट गमावल्यानंतर अंबाती आणि फाफने शतकी भागीदारी केली. मुंबईकडून रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरुवात केली. मात्र चौथ्या ओव्हरमध्ये पियूष चावलाच्या फिरकीत रोहित अडकला सॅम कुर्रानकडे कॅच आऊट झाला. रोहितला 10 चेंडूत 2 चौकारांसह 12 धावाच करता आल्या. रोहित बाद झाल्यानंतर लगेचच मुंबई इंडियन्सला दुसरा झटका बसला. पाचव्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर डी कॉक बाद झाला. क्विंटननं 5 चौकार मारत 20 चेंडूत 33 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादव आणि सौरभने चांगली सुरुवात केली. मात्र सूर्यकुमार 17 धावांवर बाद झाला. दीपक चाहरने सूर्यकुमारला बाद केले.

हार्दिक पांड्याने सामन्याची आक्रमक सुरुवात केली. मैदानात येताच त्यानं षटकार मारला, मात्र रविंद्र जडेजाच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या नादात पांड्या बाद झाला. फाफने सीमारेषेवर हार्दिकचा जबरदस्त एकहाती कॅच घेतला. सौरभ आणि हार्दिक चांगली फलंदाजी करणार असे वाटत असतानाच फाफने बाउंड्री लाईनवर जबरदस्त कॅच घेत दोघांना माघारी धाडले. नंतर कीरोन पोलार्डही जास्त चांगली फलंदाजी करू शकला नाही.