MI Squad for IPL 2021: मिनी लिलावाच्या पार्श्वभूमीवर Mumbai Indians संघाने जाहीर केली Retained आणि Released खेळाडूंची यादी; पहा कोणाला मिळाले स्थान
हा लिलाव 11 फेब्रुवारी 2021 रोजी होण्याची शक्यता आहे. आता मुंबई इंडियन्स संघाने यंदा कायम ठेवल्या जाणार्या खेळाडूंची यादी (Retained Players) जाहीर केली आहे
दुबई येथे खेळल्या गेलेल्या आयपीएल 2020 (IPL 2020) चे जेतेपद पटकावून मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पुन्हा एकदा स्वतःचे सामर्थ्य सिद्ध केले होते. आता मुंबई इंडियन्स प्रीमियर लीगच्या आगामी आवृत्तीसाठी, म्हणजेच आयपीएल 2021 (IPL 2021) सज्ज झाले आहेत. इतर टीम्सप्रमाणेच, मुंबई इंडियन्सदेखील खेळाडूंच्या लिलावासाठी रणनीती अखात आहेत. हा लिलाव 11 फेब्रुवारी 2021 रोजी होण्याची शक्यता आहे. आता मुंबई इंडियन्स संघाने यंदा कायम ठेवल्या जाणार्या खेळाडूंची यादी (Retained Players) जाहीर केली आहे.
संघाने यावर्षी अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला रिलीज केले आहे. यासह, जेम्स पॅंटीनसन आणि नॅथन कूल्टर नाईल यांनाही राखून ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळालेले नाही. मुंबईकडे 15.35 कोटी रुपये आहेत आणि आता त्यांना लिलावातून चार परदेशी खेळाडूंची गरज आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले असून आता त्यांची संघात आणखी बदल करण्याची इच्छा नाही.
रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी-
लसिथ मलिंगा, दिग्विजय देशमुख, शेरेफेन रदरफोर्ड, प्रिन्स बलवंत रायसिंह, मिचेल मॅक्लेनाघन, नॅथन कुल्टर-नाईल, जेम्स पॅटिनसन
रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी -
रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीतसिंग, सौरभ तिवारी, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, राहुल चहर, हार्दिक पंड्या, जयंत यादव, क्रुणाल पांड्या, अंकुल रॉय, ईशान किशन, आदित्य तारे, ख्रिस लिन, ट्रेंट बाउल्ट, केरॉन पोलार्ड , क्विंटन डी कॉक (हेही वाचा: ICC World Test Championship Points Table: ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाने पटकावले अव्वल स्थान, ऑस्ट्रेलियाची तिसऱ्या स्थानी घसरण)
दरम्यान, मागील वर्षी कोरोना साथीच्या साथीच्या प्रादुर्भावामुळे युएईमध्ये आयपीएल आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मलिंगाने वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेतून माघार घेतली होती. कोरोनाच्या संसर्गामुळे त्याने कुटुंबासमवेत रहाण्याचे ठरविले होते.