MCA Election 2022: संदिप पाटील विरुद्ध अमोल काळे, एमसीए निवडणुकीसठीआज मतदान; 380 मतदार ठरविणार भविष्य

या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडते आहे. यासाठी 380 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

MCA Election | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधी पक्ष आणि त्या पक्षाचे नेते अशी ओळख असलेले नेते खेळाच्या मैदानावर एकमेकांना केवळ पूरक भूमिकाच नव्हे तर थेट पाठिंबा देताना दिसत आहे. निमित्त आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक (Mumbai Cricket Association Election). या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) गट आणि भाजपचे आशिष शेलार (Ashish Shelar) गट यांची युती झाली असून, हे दोन्ही गट एकत्र येऊन माजी क्रिकेटपटू संदिप पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडते आहे. यासाठी 380 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या संयुक्त गटाच्या पॅनलकडून अमोल काळे मैदानात आहेत. तर माजी कसोटीवीर संदिप पाटील थेट मैदानात आहेत. त्यामुळे लढत थेट आहे. दुसऱ्या बाजूला न कार्यकारिणीसाठीसुद्धा निवडणूक पार पडते आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना वाहतूक संघटनेचे निलेश भोसले हे मैदानात आहेत. दरम्यान, मतदान आज दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या कालावधीत पार पडणार आहे. (हेही वाचा, MCA Election: आशिष शेलार-शरद पवार यांच्यात युती, क्रीडाविश्वात चर्चा; जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकरही एमसीए निवडणुकीच्या रिंगणात)

मतदारांची क्लबनिहाय संख्या

राजकारणाच्या आखाड्यात एकमेकांसमोर उभे ठाकणारे हेचराजकीय नेते खेळाच्या मैदानात मात्र खिलाडू वृत्ती दाखवताना दिसतात. अर्थातय त्यापाठीही त्यांची राजकीय आणि इतर काही आर्थिक गणितेही असतात हा भाग वेगळा. सर्वसामान्यांची भावना मात्र अशी की, खेळाच्या मैदानात खिलाडूवृत्ती दाखवणाऱ्यां राजकारण्यांनी ती राजकारणाच्या मैदानातही दाखवावी.

दरम्यान, एमसीए निवडणुकीपूर्वी पवार शेलार गटाकडून वानखेडे मैदानावर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र पाहायला मिळाले.