या 5 दिग्गज क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीला बसले दुखापतीचे ग्रहण, वेळेपूर्वीच करिअरला लागला पूर्णविराम

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने स्पष्ट केले की, जर त्याच्या कोपऱ्याची दुखापत बारी झाली नाही तर तो क्रिकेट सोडण्यास तयार आहे. आर्चरवर नुकतंच दीर्घकाळ असलेल्या कोपरीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. आर्चरच्या कारकिर्दीला दुखापतीचा धोका निर्माण झाला असताना भूतकाळात काही आश्वासक क्रिकेटपटूंच्या करिअरला दुखापतींमुळे पूर्णविराम लागला आहे.

मार्क बाउचर (Photo Credit: Twitter)

Cricketers who forced to Retire due to Injuries: क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे खेळाडूंना पूर्ण फिटनेसची गरज असते आणि आधुनिक काळाच्या क्रिकेटमध्ये त्याचे महत्त्व आता अधिक वाढले आहे. विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स सारखे खेळाडू मैदानावरील अ‍ॅक्रोबॅटिक्सवर जास्त भर देत आहे. नुकतंच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) स्पष्ट केले की, जर त्याच्या कोपऱ्याची दुखापत बारी झाली नाही तर तो क्रिकेट सोडण्यास तयार आहे. सध्या जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आर्चरवर नुकतंच दीर्घकाळ असलेल्या कोपरीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. आर्चरच्या कारकिर्दीला दुखापतीचा धोका निर्माण झाला असताना भूतकाळात काही आश्वासक क्रिकेटपटूंच्या करिअरला दुखापतींमुळे पूर्णविराम लागला आहे. (जगातील हे 5 दिग्गज क्रिकेटर जे परदेशी भूमीवर जन्मले पण दुसऱ्या देशासाठी खेळत मिळवली प्रसिद्धी, यादीत ‘या’ भारतीय दिग्गजाचाही समावेश)

मार्क बाउचर (Mark Boucher)

डोळ्याच्या दुखापतीनंतर मार्क बाऊचरने 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माघार घेतली. क्षिण आफ्रिका आणि समरसेट यांच्यातील मैत्री सामन्यादरम्यान इमरान ताहिरची गुगलीने विकेटच्या मागे दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टिरक्षक डोळ्यावर धडकली. त्याला लेसरेटेड नेत्र गोलकचे निदान झाले. बाऊचर त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 147 कसोटी, 295 एकदिवसीय सामने आणि 25 टी-20 सामने खेळला.

नारी कॉन्ट्रॅक्टर (Nari Contractor)

भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात दुःखद व्यक्तींपैकी एक म्हणजे नरिमन जमशेदजी कॉन्ट्रॅक्टर, उर्फ नारी कॉन्ट्रॅक्टर यांना 1962 मध्ये बार्बाडोस विरुद्ध टूर गेम खेळत असताना गंभीर दुखापत झाली. चार्ली ग्रिफिथच्या चेंडूने त्याला खोपडीत फटका बसला; त्यांचे आयुष्य काही काळ धोक्यात आले होते आणि त्याला धोक्यातून मुक्त करण्यासाठी त्यांना अनेक आपत्कालीन ऑपरेशनची आवश्यकता होती. त्यांनी दोन वर्षांनंतर धाडसी पुनरागमनाचा प्रयत्न केला परंतु ते कधीच यशस्वी होऊ शकले नाही. पदार्पणातील पहिल्या-प्रथम श्रेणी सामन्यात त्यांनी दोन्ही डावात शतके ठोकत कारकीर्दीची स्वप्नवत सुरुवात केली होती.

नॅथन ब्रॅकन (Nathan Bracken)

नॅथन ब्रॅकन हे रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघातील महत्त्वाचा सदस्य होता. वेगवान गोलंदाजाने आपल्या वेग आणि स्विंगमुळे अनेकांना त्रास दिला. दुर्दैवाने, त्याच्या कारकीर्दीला दुखापतीचे ग्रहण लागले. 2011 मध्ये गुडघ्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ब्रॅकनने एकूण 205 विकेट्स घेतल्या आहेत.

डेविड लॉरेन्स (David Lawrence)

खेळपट्टीवर सामन्यादरम्यान दुखापत झालेल्या खेळाडूंपैकी इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाजासोबत सर्वात भयानक घटना घडली. 1992 मध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:साठी नाव कमावणाऱ्या लॉरेन्सने न्यूझीलंडविरुद्ध गोलंदाजी करताना डाव्या गुडघ्याच्या वाटीला फॅक्चर झाला. लॉरेन्सच्या गुडघ्याची वाटी तुटल्यामुळे त्याला मैदानावर खूप वेदना होत होत्या आणि त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. तो केवळ 5 कसोटी सामने खेळला आणि वयाच्या 29 व्या वर्षी निवृत्त झाला.

जेफ अ‍ॅलोट (Geoff Allott)

न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज या यादीत आणखी एक गोलंदाज आहे ज्याची दुखापत कारकिर्दीत अडथळा निर्माण झाली होती. दीर्घकाळ चाललेल्या दुखापतीमुळे अ‍लोटला वयाच्या 29 व्या वर्षी निवृत्ती घ्यावी लागली. 1999 वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने संयुक्त दुसऱ्या सर्वाधिक 20 विकेट्स काढल्या होत्या. अलोटने किवी संघासाठी 10 कसोटी आणि 31 एकदिवसीय सामने खेळले. दोन फॉरमॅटमध्ये अनुक्रमे 19 आणि 52 गडी बाद केले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now