महेंद्र सिंह धोनी याचा मोदी जॅकेट घातलेला फोटो पाहिला आहे का? राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण
फोटोसह जहां जनता, वहां हम असे लिहून पोस्ट केले आहे. जरी हा केवळ फोटोशूटचा भाग असला तरी, धोनी खरेच राजकारणाच्या मैदानात फलंदाजी करेल का? याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. सध्या नवज्योत सिद्धू आणि गौतम गंभीर यांसारख्या दिग्गज खेळाडू राजकारणात सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे.
महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) हा अतिशय लोकप्रिय खेळाडू आहे. महेंद्र सिंह धोनी भारतीय क्रिकेट संघासाठी मोठे योगदान दिले आहे. अशक्य असे काहीच नसते, अशी महेंद्र सिंह धोनीची ओळख आहे. मुंबई (Mumbai) येथे पार पडलेल्या एका फोटोशूटमध्ये धोनी नव्या लूकमध्ये पाहायला मिळाला आहे. यामध्ये महेंद्र सिंह धोनीने राजकीय वेशभूषा साकरल्याचे दिसत आहे. यामुळे या फोटोला अनेक लोकांनी लाईक करुन शेअर केले आहे. धोनीचा हा फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच धोनी राजकाराणात पाहायला मिळेल का? असा प्रश्नही पडले आहेत.
एम.एस.धोनी फॅन्स ऑफिशीअल पेजवरून हे ट्विट करण्यात आले. फोटोसह जहां जनता, वहां हम असे लिहून पोस्ट केले आहे. जरी हा केवळ फोटोशूटचा भाग असला तरी, धोनी खरेच राजकारणाच्या मैदानात फलंदाजी करेल का? याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. सध्या नवज्योत सिद्धू (Navjot Singh Sidhu) आणि गौतम गंभीर (Gauttam Ghambhir) यांसारख्या दिग्गज खेळाडू राजकारणात सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा-मी जेव्हा मैदानात असतो तेव्हा फक्त संघाचाच विचार करतो- अजिंक्य रहाणे
यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सैन्याच्या वर्दीत दिसला होता. सैन्यात महेंद्र सिंह धोनीने लेफ्टनंट कर्नल असे पद मिळवले आहे. काहीदिवस महेंद्र सिंह धोनी भारतीय जवानांसोबत काश्मीरमध्ये होते. नुकताच पार पडलेल्या विश्वचषकात महेंद्र सिंह धोनी हा निवृत्ती घेईल, अशी सर्वत्र बातमी पसरली होती. परंतु धोनीने भारतीय सैन्यासोबत काम करायचे ठरवले. धोनीने आतापर्यंत ३५० एकदिवसीय सामने खेळले असून १० हजारहून अधिक धावांचा पल्ला गाठला आहे.