Lockdown 4.0: लॉकडाउन नियम शिथिल केल्यावर रविचंद्रन अश्विन घेतोय बेबी स्टेप्स, सुरु केले आउटडोर प्रशिक्षण, पाहा VIDEO
लॉकडाउनचा चौथा ठप्प भारतात सुरु झाला आहे. रविवारी गृह मंत्रालयाने क्रीडा संकुल आणि स्टिडिया उघडण्यास परवानगी दिली. या आधारावर भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने चेन्नईमध्ये आउटडोर प्रशिक्षण सुरु केले. अश्विनने नेट्समध्ये गोलंदाजी करत असल्याची एक क्लिप शेअर केली. "एका वेळी एक पाऊल !!! बेबी स्टेप्स," अश्विनने आपल्या पोस्टला कॅप्शन दिले.
लॉकडाउनचा (Lockdown) चौथा ठप्प भारतात सुरु झाला आहे. रविवारी गृह मंत्रालयाने देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली, पण क्रीडा संकुले आणि स्टेडियमवरील वापरावरील निर्बंधावरील सवलतीबाबतही स्पष्टीकरण दिले. "क्रीडा संकुल आणि स्टिडिया उघडण्यास परवानगी देण्यात येईल. तथापि, प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही," असे एमएचएने (MHA) सांगितले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) म्हटले आहे की खेळ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर घाई करणार नाही आणि करार केलेल्या खेळाडूंसाठी कौशल्य-आधारित प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यापूर्वी पुढील मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा करेल. दरम्यान, लॉकडाउन 4.0 चे नियम शिथिल केल्यावर भारताचा वर्ल्ड कप विजेता फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने चेन्नईमध्ये (Chennai) आउटडोर प्रशिक्षण सुरु केले. अश्विनने नेट्समध्ये गोलंदाजी करत असल्याची एक क्लिप शेअर केली. "एका वेळी एक पाऊल !!! बेबी स्टेप्स," अश्विनने आपल्या पोस्टला कॅप्शन दिले. (Lockdown मध्ये सचिन तेंडुलकर हातात काठी घेऊन पाडतोय झाडावरचे लिंबू; हरभजन सिंह ने Video शेअर करत केली 'ही' मागणी)
लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता मिळाल्यावर अश्विन समवेत अन्य खेळाडूंनीही प्रशिक्षणास सुरुवात केली आहे. तब्बल दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर खेळाडूंना बाहेर पडून प्रशिक्षण घेण्याची परवानगी केंद्र सरकारने कडून देण्यात आली. मात्र, मुंबई सारख्या 'रेड झोन' मधील खेळाडूंना आद्यप परवानगी नाही. सरकारने ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या शहरातील खेळाडूंना बाहेर सराव करू देण्याचे मान्य केले आहे.कोरोना व्हायरसमुळे जगातील क्रीडापटूंना घरातील प्रशिक्षणापुरतं मर्यादित ठेवण्यात आले ज्याचा जागतिक क्रीडा दिनदर्शिकेवर मोठा परिणाम झाला. भारतात, इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) एप्रिल ते मेची मुदत चुकवली कारण बीसीसीआयने टी -20 लीगला पुढील सूचना येईपर्यंत स्थगित केले. पाहा अश्विनची पोस्ट:
View this post on Instagram
One step at a time!!! Baby steps 🤩🤩
A post shared by Stay Indoors India 🇮🇳 (@rashwin99) on
दुसरीकडे, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाउन 4.0 च्या नियम शिथिलतेवर निवेदन जाहीर करत म्हटले, "31 मे पर्यंत हवाई प्रवास आणि लोकांच्या वाहतुकीवरील निर्बंध विचारात घेतल्यास, बीसीसीआय करारबद्ध खेळाडूंसाठी कौशल्य-आधारित प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यापूर्वी आणखी प्रतीक्षा करेल."
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)