Lockdown मध्ये सचिन तेंडुलकर हातात काठी घेऊन पाडतोय झाडावरचे लिंबू; हरभजन सिंह ने Video शेअर करत केली 'ही' मागणी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हातात काठी घेऊन झाडावरचे लिंबु पाडत असतानाचा एक व्हिडिओ शेअर करुन हरभजन सिंह याने सचिन कडे लिंंबुंंची मजेशीर मागणी केली आहे.

Lockdown मध्ये सचिन तेंडुलकर हातात काठी घेऊन पाडतोय झाडावरचे लिंबू; हरभजन सिंह ने Video शेअर करत केली 'ही' मागणी
Sachin Tendulkar (Photo Credits: Twitter)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ने हातात बॅट घेऊन आजवर केलेली कमाल सगळ्या जगाला माहित आहे, किंबहुना सचिनच्या हातातील बॅट हीच त्याची ओळख आहे. मात्र यावेळेस सचिन ने बॅट ऐवजी हातात चक्क लांबच लांब काठी घेतल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. नाही घाबरू नका ही काठी सचिनने कोणाला मारण्यासाठी नाही तर झाडावरून ईडलिंबू पाडण्यासाठी हातात घेतली होती. लॉक डाऊन (Lockdown) मध्ये अडकलेले असताना घरची मंडळी आणि मित्रांसोबत टाइम एन्जॉय करत सचिन अलीकडे रोज असेच मजेशीर व्हिडीओज आपल्या सोशल मीडियावरून शेअर करत असतो. यातीलच आज एक लिंबू पाडतानाचा व्हिडीओ पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ हरभजन सिंह (Harbhajan Singh)  याने शेअर करून सचिनकडे एक खास मागणी केली आहे. सचिन तू लिंबू पाडतोयस तर माझ्यासाठी ही 2-3  लिंबू काढून ठेव अशा मागणीचे कॅप्शन देत हरभजनने हा व्हिडीओ शेअर केला आहे. लॉकडाउन काळात पत्नी अनुष्का शर्मासाठी डायनासोर बनला विराट कोहली, पाहा मजेदार व्हायरल Video

हरभजन सिंह याने शेअर केलेल्या व्हिडीओ मध्ये सचिन झाडावरून काहीतरी पाडताना दिसत आहे. यावेळी त्याचे काही मित्र सुद्धा सोबत आहेत. मागून कोणीतरी कॉमेंट्री देताना ऐकू येतंय. सचिनने ईडलिंबू पाडताच हा कॉमेंट्री करणारा व्यक्ती आंबा पडल्याचे सांगत आहे ज्यावर सचिन त्याला करेक्ट करत हा आंबा नाही लिंबू आहे असे सांगतो. अर्थात हा ईड लिंबू असल्याने त्याचा आकार नेहमीपेक्षा मोठा असतो. त्यामुळे आपल्यालाही सुरुवातीला बघून आश्चर्य वाटते. तुम्हीही बघा हा व्हिडीओ..

हरभजन सिंह ट्विट

Sunil Chhetri बनला रेसिस्ट टिप्पणीचा शिकार; Virat Kohli बरोबर लाईव्ह चॅट दरम्यान वर्णद्वेषी कमेंट - Watch Video

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सचिनने युवराज सिंह याने दिलेले एक चॅलेंज पूर्ण करताना डोळ्यावर पट्टी बांधून बॅट आणि बॉल घेऊन खेळताना व्हिडीओ शेअर केला होता. लॉक डाऊन काळात सचिन आपल्या सोशल मीडिया पेजेस वर नेहमीपेक्षा जास्त ऍक्टिव्ह झाला आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 20, 2020 06:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).