IND vs PAK U19 World Cup 2020 Semi-Final Highlights: अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडिया, पाकिस्तानला केले पराभूत
अंडर-19 विश्वचषकमधील पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारताचा सामना मंगळवारी पाकिस्तानशी होईल. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला पराभूत केले तर ते 7 व्या वेळी अंतिम फेरी गाठू शकतील. भारत पहिल्यांदा 2000 मध्ये अंतिम फेरी गाठली होती आणि तेव्हा ते चॅम्पियन बनले होते.
भारत आणि पाकिस्तानमधील अंडर-19 विश्वचषकच्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात माजी गतजेता टीम इंडियाने 10 विकेटने विजय मिळवला आणि विश्वचषकच्या फायनलमध्ये धडक मारली. पाकिस्तानने पहिले फलंदाजी करत दिलेल्या 173 धावांचे लक्ष्य भारताने 35.2 ओव्हरमधेच गाठले. भारताने पहिले गोलंदाजीने आणि नंतर फलंदाजीने कमाल कामगिरी करत विजयाची नोंद केली.
पाकिस्तानविरुद्ध अंडर-19 विश्वचषकच्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारताचा सलामी फलंदाज यशस्वी जयस्वाल याने 66 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या स्पर्धेतील त्याचे हे चौथे अर्धशतक आहे. भारताने 22 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 100 धावा पूर्ण केल्या. यासह यशस्वी आणि दिव्यांश सक्सेना यांनी शतकी भागीदारीही पूर्ण झाली. दिव्यांश 40 यशस्वी 54 धावा करून खेळत आहे.
भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वाल आणि दिव्यांश सक्सेनाने शानदार सुरुवात केली. दोन्ही खेळाडू हळू हळू भारतीय डाव पुढे नेत आहे. 18 ओव्हरनंतर टीम इंडियाने एकही विकेट न गमावता 77 धावा केल्या. यशस्वी 36 आणि दिव्यांश 34 धावा करून खेळत आहे. भारताला आता विजयासाठी 95 धावांची गरज आहे.
14 व्या षटकात भारताच्या 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. यशस्वी जयस्वालने कासिम अकरमच्या षटकात दोन चौकार ठोकले. दिव्यांश आणि यशस्वी ने भारताला जबरदस्त सुरुवात करून दिली आहे.
पाकिस्तानने पहिले फलंदाजी करत दिलेल्या 172 धावांच्या प्रत्युत्तरात भारताने सावध सुरुवात केली. 10 ओव्हरनंतर एकही विकेट न गांवात भारताने 33 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल 15 आणि दिव्यांश सक्सेना 14 धावा करून खेळत आहे.
अंडर-19 विश्वचषकच्या पहिल्या सेमीफाइनल सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकला आणि पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत पहिले फलंदाजी करत पाकिस्तानने ओव्हरमध्ये 172 धावांवर ऑलआऊट झाला आणि भारताला विजयासाठी 173 धावांचे लक्ष्य दिले. टीम इंडियाने आज टॉस गमावला असला तरीही त्यांच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली.
कार्तिक त्यागीने पाकिस्तानला सहावा धक्का दिला. त्यागीने 38 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर इरफान खानला बोल्ड केले. इरफानने आज 9 चेंडूंचा सामना करत 3 धावा केल्या. पाकिस्तानने 156 च्या धावसंख्येवर सहावी विकेट गमावली.
पाकिस्तानी कर्णधार रोहेल नजीर ने आज भारतविरुद्ध अर्धशतक पूर्ण केले आणि पाकिस्तानची धावसंख्या 150 पार नेली. रोहेलने 84 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. चौथ्या क्रमांकावर आलेल्या रोहेलने हे काम कठीण परिस्थितीत केले. पाकिस्तानने 37 ओव्हरनंतर 5 विकेट गमावून 156 धावा केल्या आहेत.
रोहिल नजीरशी समन्वय नसल्यामुळे कासिम अकरम धावबाद झालं. 31 व्या षटकातील तिसर्या बॉलवर कासिमने कव्हरवर शॉट खेळला आणि दोघांनी एकाच मार्गाने धाव घेतली आणि कासिमला त्याची विकेट गमवावी लागली. तो 16 चेंडूत नऊ धावा करुन माघारी परतला.
24 व्या षटकात रवि बिश्नोईने चौकार ठोकत हैदर अलीने आपले अर्धशतक पूर्ण केले. हैदरने हुरैराची विकेट गमावल्यानंतर कर्णधार रोहेल नजीरसोबत पाकिस्तानचा डाव सावरला. त्याने 70 चेंडूत नऊ चौकारांसह 50 धावा पूर्ण केल्या आहेत.
आकाश सिंह याने 14 वी ओव्हर टाकली. या ओव्हरमध्ये पाकिस्तानने 50 धावा पूर्ण केल्या. रोहेल नजीर आणि हैदर अली यांनी 20 धावांची भागीदारी केली. दोघेही आता कोणत्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीत आणि डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून 12 ओव्हर संपल्यानंतर दोन गडी गमावून 45 धावा केल्या. चौथी ओव्हर भारतीय संघासाठी वेगवान गोलंदाज सुशांत मिश्राने टाकली. यामध्ये चौथा बॉल पाकिस्तानी सलामी फलंदाज हैदर अलीच्या खांद्यावर लागली आणि त्याला दुखापत झाली. तो सध्या 29 धावा करून खेळत आहे.
टीम इंडियाविरुद्ध टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या पॉवर-प्लेमध्ये त्यांनी 2 विकेट गमावून 36 धावा केल्या. हैदर अली 24 आणि रोहेल नजीर 0 धावा करून खेळत आहे.
टॉस गमावून पहिले गोलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला सुशांत मिश्राने पहिल्याच ओव्हरमध्ये यश मिळवून दिले. मोहम्मद हुरैरा 4 धावांवर बाद झाला. हुरायराने मिड विकेटची चौकार मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू बॅटच्या कोपऱ्याला लागला आणि मिड विकेटवर तिलक वर्माने झेल पकडला.
अंडर-19 विश्वचषक (World Cup) मधील पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारताचा (India) सामना मंगळवारी पाकिस्तानशी (Pakistan( होईल. दोन्ही संघांचा सलग दुसऱ्यांदा सेमीफायनलमध्ये आमने-सामने येत आहे. 2018 मध्ये अखेरच्या वेळी भारताने पाकिस्तानला 203 धावांनी पराभूत केले होते. भारत आणि पाकिस्तानमध्ये आजवर खेळलेल्या 8 सामन्यांमध्ये दोन्ही संघाने प्रत्येकी 4-4 सामने जिंकले आहेत. मात्र, 8 वर्षांपासून टीम इंडिया त्याच्याविरूद्ध पराभूत झालेली नाही. पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा अखेरचा पराभव 2010 मध्ये झाला होता. त्यानंतर पाकिस्तानने सेमीफायनल सामना 2 गडी राखून जिंकला होता. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला पराभूत केले तर ते 7 व्या वेळी अंतिम फेरी गाठू शकतील. भारत पहिल्यांदा 2000 मध्ये अंतिम फेरी गाठली होती आणि तेव्हा ते चॅम्पियन बनले होते.
या स्पर्धेत भारताने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले. त्यानंतर जपान आणि न्यूझीलंडविरूद्ध सामना जिंकत क्वार्टर फायनल फेरी गाठली. आणि नंतर उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. दुसरीकडे, पहिल्या सामन्यात पाकिस्तानने स्कॉटलंडचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी झिम्बाब्वेला पराभूत केले. त्यानंतर पावसामुळे बांग्लादेशविरुद्ध सामना रद्द करण्यात आला होता, उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पराभव केला. या स्पर्धेत यशस्वी जयस्वालने भारतासाठी सर्वाधिक 207 धावा केल्या. गोलंदाजीत रवी बिश्नोई सर्वाधिक यशस्वी झाला. त्याने 4 सामने 11 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद हॅरिस याने फलंदाजीने प्रभावित केले. त्याने 4 सामन्यांत 110 धावा केल्या. गोलंदाजीत अब्बास आफ्रिदीने 4 सामन्यात सर्वाधिक 9 विकेट्स घेतल्या.
पाकिस्तान अंडर-19 टीम: रोहेल नजीर (कॅप्टन आणि विकेटकीपर), हैदर अली (उपकर्णधार), अब्बास आफ्रिदी, कासिम अक्रम, आमिर अली, अब्दुल बांगलझई,मोहम्मद हॅरिस, फहाद मुनीर, मोहम्मद हुरैरा, ताहिर हुसेन, अमीर खान, अरीश अली खान, मोहम्मद इरफान खान, मोहम्मद वसीम, मोहम्मद शहजाद.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)