IND vs NZ 5th T20I Highlights: भारताने न्यूझीलंडला 5-0 ने केले पराभूत, 7 धावांनी जिंकला शेवटचा सामना
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचा पाचवा आणि शेवटचा सामना आज माउंट मौंगानुई येथील बे ओव्हल क्रिकेट मैदानात खेळला जाईल. भारतीय संघ पहिल्यांदा पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे आणि 5-0 च्या फरकाने जिंकण्याची सुवर्ण संधी आहे.
टीम इंडियाने पहिले फलंदाजी करत दिलेल्या 164 धावांच्या प्रत्युत्तरात यजमान न्यूझीलंड संघाला 7 धावांनी पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने पाचव्या आणि अंतिम टी-20 सामन्यात किवी संघाचा 5-0 असा मालिकेत क्लीन स्वीप केला आणि पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेत सर्व सामने जिंकणारा हा पहिला संघ बनला.
भारताने दिलेल्या 164 धावांच्या लक्ष्यासमोर, किवी संघाने 15 षटकांनंतर पाच विकेट गमावून 122 धावा केल्या आहेत. विजयासाठी अद्याप संघाला 30 चेंडूंत 42 धावांची गरज आहे.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने किवी फलंदाज डेरील मिशेलला दोन धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बोल्ड केल्यानंतर भारताची सामना आशा पुन्हा जिवंत झाली. न्यूझीलंडला अद्याप विजयासाठी 36 चेंडूत 45 धावांची गरज आहे.
शिवम दुबेने भारतासाठी दहावी ओव्हर टाकली. दुबेच्या या षटकात किवी फलंदाजांनी 3षटकार, दोन चौकार, एक षटकार आणि एक फ्री हिटसह एकूण 34 धावा केल्या. तीन षटकांनंतर तीन गडी गमावून संघाची धावसंख्या 98 धावा आहे. टीमकडून टीम सेफर्ट 36 आणि रॉस टेलर 41 धावा करून खेळत आहे.
भारताच्या 164 धावांच्या प्रत्युत्तरात यजमान न्यूझीलंडने पाच षटकांनंतर तीन गडी गमावून 32 धावा केल्या आहेत. विकेटकीपर-फलंदाज टिम सेफर्ट 8 आणि रॉस टेलर 6 करून खेळत आहेत.
टीम इंडियाने दिलेल्या 164 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडला पहिला मोठा धक्का बसला. जसप्रीत बुमराहने किवी सलामी फलंदाज मार्टिन गप्टिलला दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट केले. गप्टिलने आज 2 धावा केल्या.
माउंट मौंगानुईच्या बे ओव्हल येथे भारत आणि यजमान न्यूझीलंड संघात खेळल्या जाणार्या 5 सामन्यांच्या टी -20 मालिकेच्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 बाद 163 धावा केल्या आणि किवी संघाला विजयासाठी 164 धावांची लक्ष्य दिले. श्रेयस अय्यर 33 आणि मनीष पांडे 11 धावा करून नाबाद परतले.
रोहित शर्माला न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या सामान्यत दुखापत झाल्याने मैदाना बाहेर जावे लागले आहे. रोहितने आज 41 चेंडूंचा सामना करत नाबाद 60 धावा केल्या. 17 व्या षटकातील पहिल्या चेंडूनंतर फिजिओला त्याची तपासणी करण्यासाठी मैदानावर यावे लागले.
न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या टी-२० सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माने 21 वे अर्धशतक झळकावले. रोहितने या खेळी दरम्यान 3 चौकार आणि 2 षटकार मारले.
या सामन्यात केएल राहुल अर्धशतकापासून अवघ्या पाच धावांच्या अंतरावर होता, जेव्हा हमीश बेनेटने त्याला सॅटनरच्या झेलबाद केले. राहुल 45 धावांवर बाद झाला. अर्धशतक ठोकण्याची नामुष्की त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
भारताने दमदार शैलीने सुरुवात केली होती, परंतु आता डाव थोडा मंदावला आहे. रोहितने सँटनरच्या चेंडूवर एकेरी धाव घेतली आणि यासह त्याने राहुलबरोबर 50 धावांची भागीदारी केली. आजच्या सामन्यात विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे आणि म्हणूनच आज रोहित संघाचे नेतृत्व करत आहे.
पाचव्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि सहा ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी गमावून 53 धावा केल्या. रोहित शर्मा 13 तर केएल राहुल 33 धावा करून खेळत आहे. संजू सॅमसन न्यूझीलंडविरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. त्याने पाचव्या टी-20 सामन्यात 2 धावा केल्या.
टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला सुरुवातीलाच पहिला धक्का लागला. सलामीला आलेला संजू सॅमसन पुन्हा एकदा धावा करण्यात अपयशी ठरला. रोहित शर्माच्या जागी डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या सॅमसनने आज 5 चेंडूचा सामना करत 2 धावा केल्या.
न्यूझीलंड आणि भारत आज टी-20 मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात माउंट मौंगानुई येथील बे ओव्हल क्रिकेट मैदानात आमने-सामने येत आहे. आजच्या सामन्यात टॉस जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्णधार विराट कोहली ला विश्रांती देण्यात आली आहे. संजू सॅमसन प्लेयिंग इलेव्हनमध्ये कायम ठेवण्यात आल्याने तो केएल राहुलसह डावाची सुरुवात करेल आणि रोहित तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करेल.
भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचा पाचवा आणि शेवटचा सामना आज माउंट मौंगानुई (Mount Maunganui) येथील बे ओव्हल क्रिकेट मैदानात खेळला जाईल. भारतीय संघ पहिल्यांदा पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे आणि 5-0 च्या फरकाने जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. या मालिकेचा पाचवा सामना किवी संघाचा नियमित कर्णधार केन विल्यमसन याच्या होम ग्राऊंडवर खेळला जात आहे, तरी त्याला या सामन्यातून बाहेर राहावे लागू शकते. तिसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान विल्यमसनला खांद्यावर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला चौथ्या सामन्याला मुकावे लागले होते.
या मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने यजमान किवींचा सहा विकेटने पराभव केला होता, तर दुसर्या सामन्यात 15 चेंडू बाकी असताना त्यांचा सात विकेटने पराभव झाला होता. तिसर्या सामन्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अंतिम षटकात नऊ धावांचा बचाव केला आणि सामना सुपर ओव्हरपर्यंत नेला. मात्र, गोलंदाजीतही संघाचा सर्वात अनुभवी गोलंदाज टीम साऊथी सुपर षटकात 18 धावांचा बचाव करू शकला नाही आणि भारताचा सलामी फलंदाज रोहित शर्माने सलग दोन षटकार ठोकत भारताला सामना जिंकवून दिला. (सामन्याचे थेट स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
चौथा सामनाही सुपर ओव्हरपर्यंत गेला आणि यात देखील किवी संघाला जिंकता आले नाही. किवी संघ शेवटच्या षटकात सात धावा करू शकला नाही आणि भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूरने सात धावांचा बचाव करण्याव्यतिरिक्त दोन गडीही बाद केले. या सामन्यात भारतीय संघाने आपले वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली होती आणि असे असूनही न्यूझीलंडचा संघ जिंकू शकला नाही.