U19 World Cup 2020 Final Highlights: भारताला पराभूत करून बांग्लादेश ने जिंकला अंडर-19 विश्वचषक विजेता
भारत-बांग्लादेशमधील विजेतेपदासाठीची स्पर्धा रंजक ठरणार आहे. बांग्लादेश पहिल्यांदा कोणताही पुरुष विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहचला आहे. दुसरीकडे, आज जर भारत जिंकला तर पाचव्यांदा ज्युनियर विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवेल.
भारत-बांग्लादेश अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये टॉस गमवून पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने दिलेल्या 178 धावांच्या प्रत्युत्तरात बांग्लादेशने 3 विकेटने विजय मिळवला आणि स्पर्धेचे जेतेपद जिंकले. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे बांग्लादेशला नियमानुसार सुधारित 170 धावांचे लक्ष्य मिळाले जे त्यांनी 42.1 ओव्हरमध्ये गाठले. बांग्लादेशकडून सलामी फलंदाज परवेझ हुसेन इमोन याने संघर्ष केला. इमोन 47 धावांचा डाव खेळला. बांग्लादेशी कर्णधार अकबर अली ने नाबाद 43 धावांचा खेळ केला आणि बांग्लादेशला पहिल्यांदा आयसीसीचे जेतेपद मिळवून दिले.
अंडर-19 विश्वचषकचे पहिल्यांदा जिंकण्यासाठी 15 धावांची गरज असताना पावसाळा सुरुवात झाली आहे. डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे त्यांच्याकडे 16 धावांची आघाडी आहे. जर खेळाडू मैदानावर परतले नाही नाहीत तर बांग्लादेशला विश्वचषक विजेता घोषित केले जाईल.
भारत-बांग्लादेशमधील अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. याचा नुकसान भारताला होणार आहे कारण बांगलादेशकडे डकवर्थ/लुईसनियमाप्रमाणे 2 धावांची आघाडी आहे. 26 ओव्हरनंतर बांग्लादेशने 147 धावा केल्या आहेत.
भारतीय गोलंदाजांनी भारताचा विजय जवळपास निश्चित केला आहे. रवि बिश्नोईच्या चार विकेट्सनंतर सुशांत मिश्राने बांग्लादेशला पाचवा धक्का दिला. सुशांतने शमीम हुसेनला यशस्वी जयस्वालकडे कॅच आऊट केले. हुसेनने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण यशस्वीने पुढे उडी मारत कॅच पकडला. टीम इंडियाला विजयासाठी अजून पाच विकेट्सची गरज आहे.
सामन्यात रवी बिश्नोईने भारताला पुनरागमन करून दिले आहे. त्याने शहादत हुसेनला आपला चौथा बळी बनवला. बांग्लादेशने एकावेळी 50 धावांवर एकही विकेट गमावली नव्हती, पण 65 धावांवर त्यांनी आता चार विकेट्स गमावल्या आहेत.
भारतीय गोलंदाजांनी भारताच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. तौहीद हृदयच्या रूपात बांग्लादेशला तिसरा झटका लागला. बिश्नोईने 62 धावांवरहृदॉयला एलबीडब्ल्यू आऊट केले. भारताला जिंकण्यासाठी ७ विकेट हव्या आहेत, बांग्लादेशला अजून 35 ओव्हरमध्ये 114 धावांची गरज आहे.
13 व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर रवी बिश्नोईने भारताला दुसरे यश मिळवून दिले. बांग्लादेशचा महमूदुल हसन जॉयला 12 चेंडूत 8 धावांवर बिश्नोईने बोल्ड केले. रवीने भारताच्या आशा जागवल्या आहेत.
भारताला पहिले यश मिळाले. रवी बिश्नोईने हसनला कार्तिक त्यागीने झेलबाद केले. बिश्नोईच्या चेंडूवर हसनने हवेत शॉट मारला जो थेट त्यागीच्या हातात गेला. हसनने 17 धावा केल्या.
परवेज हुसैन अमन आणि तनजीद हसन यांनी बांग्लादेशकडून टीम इंडियाविरुद्ध डावाची सुरुवात केली. दोंघांनी मिळून 4 ओव्हरमध्ये बांग्लादेशसाठी 28 धावा केल्या. दोघे फलंदाज प्रत्येकी 8 धावा करून खेळत आहे.
बांग्लादेशविरुद्ध पहिले बॅटिंग करत भारत 47.2 ओव्हरमध्ये 177 धावांवर ऑलआऊट झाला. बांग्लादेशने सुरुवातीपासून भारतावर वर्चस्व गाजवले. भारताकडून यशस्वी जयस्वाल याने एकटा संघर्ष केला आणि सर्वाधिक 88 धावा केल्या. बांग्लादेशकडून अविशेक दास याने सर्वाधिक 3, शॉरिफुल इस्लाम 2, तन्झिम हसन सकीब, अविशेक दासने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
यावेळी पुन्हा फलंदाजांमध्ये समन्वयाचा अभाव दिसला आणि रवी बिश्नोई रनआऊट झाला. भारताची सातवी विकेट 170 धावांवर पडली. शोरीफुलच्या चेंडूवर अथर्व आणि रवीने एक धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण बिष्णोई वेळेत क्रीजच्या आत पोहचू शकला नाही आणि रनआऊट झाला. भारताची शेवटची आशा अथर्व आंकोळेकरदेखील तीन धावा करुन बाद झाला.
बांग्लादेशने 156 धावांवर भारताचा अर्धा संघ तंबुत पाठवला आहे. शॉफुल इस्लामने 40 व्या षटकात भारताला दोन मोठे धक्के दिले. षटकातील पाचव्या चेंडूवर जयस्वालने तंजीद हसनकडे कॅच आऊट झाला. जयस्वाल 121 चेंडूत 88 धावा करुन परतला. या खेळीत त्याने आठ चौकार आणि एक षटकार लगावला. त्यानंतर पुढील चेंडूवर सिद्धेश वीर शून्यवत आऊट होऊन माघारी परतला.
रकीबुलच्या 32 व्या षटकातील तिसर्या चेंडूवर त्याने भारताचा कर्णधार प्रियम गर्गला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कर्णधार प्रियामला कव्हरच्या दिशेने एक शॉट खेळायचा होता पण चेंडू सरळ तन्झिम हसनकडे दिला आणि कॅच आऊट झाला. नऊ चेंडूत सात धावा करून पराग माघारी परतला.
टीम इंडियाला दुसरा झटका दिला. शाकिबने तिलक वर्माला शॉरिफुल इस्लामकडे बाउंड्री लाईनवर कॅच आऊट केले. षटकार मारण्याच्या प्रयत्नात तिलक कॅच आऊट झाला. वर्माने आज 38 धावा केल्या आणि यशस्वी जयस्वालसह दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.
टीम इंडियाचा सलामी फलंदाज यशस्वी जयस्वालने बांग्लादेशविरुद्ध अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये 89 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यशस्वीचे हे विश्वाचशकमधील चौथे अर्धशतक आहे, शिवाय त्याने एक शतकही केले आहे.
बांग्लादेशविरुद्ध सुरुवातीला धक्का बसल्यावर यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्माने भारताचा डाव सांभाळला आहे. दोंघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली असून दोनघे हळूहळू धावांचा वेग वाढवत आहे. 26 ओव्हरनंतर यशस्वी 46 धावा करून अर्धशतकाच्या जवळ पोहचला आहे. तर तिलक 30 धावा करून त्याला साथ देत आहे.
शमीम हुसेनने 17 वी ओव्हर टाकली. यशस्वी जयस्वालने चौकारासह सुरुवात केली. जयस्वालने मिड विकेटमध्ये शॉट खेळला आणि भारताची धावसंख्या 50 पार पर्यंत नेली. 18 ओव्हरनंतर यशस्वी 35 आणि तिलक वर्मा 16 धावा करून खेळत आहे.
एका संघाने सातव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला, तर दुसर्याने पहिल्यांदा विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला. एक संघ चार वेळा चॅम्पियन बनला, तर दुसर्याला विजेतेपद जिंकण्याची प्रथम संधी आहे. असे असूनही भारत (India)-बांग्लादेश (Bangladesh) देशांत एक साम्य आहे. म्हणजेच दक्षिण आफ्रिकामध्ये सुरु असलेल्या 13 व्या अंडर-19 विश्वचषक (U19 World Cup) मध्ये दोन्ही संघांनी एकही सामना गमावलेला नाही. अशा परिस्थितीत रविवार, 9 फेब्रुवारी रोजी दोन्ही संघातील विजेतेपदासाठीची स्पर्धा रंजक ठरणार आहे. भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला दहा गडी राखून पराभूत करून अंतिम फेरी गाठली, तर दुसर्या उपांत्य सामन्यात बांग्लादेशने न्यूझीलंडला 6 विकेट्सने हरवून भारताविरुद्ध अंतिम सामना निश्चित केला. भारताने सर्वाधिक सर्वाधिक चार वेळा जिंकली असली तरीही अंतिम फेरीत संघ बांग्लादेशला हलक्यात घेण्याची चूक करू शकत नाही.
बांग्लादेश पहिल्यांदा कोणताही पुरुष विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहचला आहे. दुसरीकडे, आज जर भारत जिंकला तर पाचव्यांदा ज्युनियर विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवेल. त्यामुळे, दोन्ही देशांमधील हा सामना ऐतिहासिक आहे. भारतीय अंडर-19 संघाने आजवर ज्या प्रकारचा खेळ दर्शविला ते सिद्ध करते की ते खेळाच्या प्रत्येक विभागात एक उच्च दर्जाचा संघ आहे. यशस्वी जयस्वालने फलंदाजीत तीन अर्धशतक आणि शतक झळकावले आहे. तसेच त्याने या स्पर्धेत सर्वाधिक धावाही केल्या आहेत. यशस्वीने 156 च्या सरासरीने 312 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत कार्तिक त्यागी, सुशांत मिश्रा, रवी बिश्नोई आणि अथर्व आकोळेकर यांनी सातत्याने चांगली कामगिरी केली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)