IND vs WI 3rd ODI 2019 Match Live Streaming: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर

काटकमध्ये वेस्ट इंडिज भारताविरुद्ध 13 वर्षानंतर द्विपक्षीय मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. भारताला त्यांच्या फिल्डिंगमध्ये सुधार करण्याची गरज आहे. टी-20 नंतर वनडेत देखील भारताची फिल्डिंग खराब दिसली.

विराट कोहली आणि किरोन पोलार्ड (Photo Credits: IANS)

रविवारी भारतीय क्रिकेट संघ (Indian Team) तिसर्‍या वनडे सामन्यात वेस्ट इंडीज (West Indies) विरुद्ध सलग दहावी द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. वेस्ट इंडीजने चेन्नईत झालेल्या पहिल्या सामन्यात शानदार विजय नोंदविला होता, पण विशाखापट्टणममधील दुसरा सामन्यात भारताने बाजी मारली आणि मालिका 1-1 ने बरोबरीत आणली. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खाते उघडू शकला नाही परंतु रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अन्य फलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने हॅटट्रिक घेत भारताला 107 धावांनी विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजविरुद्ध रोहितने दुसऱ्या मॅचमध्ये निर्णय 159 धावांची खेळी केली. केएल राहुल (KL Rahul) याने त्याला चांगली साठी दिली. रोहित आणि राहुलमध्ये पहिल्या विकेटसाठी रेकॉर्ड 220 धावांची भागीदारी झाली. जूनमध्ये पाकिस्तानविरुद्ध विश्वचषक सामन्यात पहिल्यांदा डावाची सुरुवात केलेल्या राहुलने वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार कामगिरी करून जागा जवळपास पक्की केली आहे. (IND vs WI 3rd ODI: कटक वनडे मॅचमधून दीपक चाहर आऊट, नवदीप सैनी याचा टीम इंडियात समावेश)

पण, भारताला त्यांच्या फिल्डिंगमध्ये सुधार करण्याची गरज आहे. टी-20 नंतर वनडेत देखील भारताची फिल्डिंग खराब दिसली. श्रेयस अय्यरने शिमरोन हेटमायर याला धावबाद केले असले तरीही दीपक चाहर ने निकोलस पूरन आणि शाई होप यांचे झेल सोडले. हेटमायर आणि होपने पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले होते. दरम्यान, काटकमध्ये वेस्ट इंडिज भारताविरुद्ध 13 वर्षानंतर द्विपक्षीय मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असेल.

वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा वनडे सामना रविवारी भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजेपासून खेळला जाईल, तर दुपारी 1.00 वाजता टॉस होईल. हा सामना भारतीय क्रिकेट चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. या मॅचची लाईव्ह स्ट्रीमिंग आपण हॉटस्टारवर पाहू शकता.

असे आहे भारत आणि वेस्ट इंडिज संघ:

भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, मयंक अग्रवाल, मनीष पांडे, शिवम दुबे, केदार जाधव, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूर.

वेस्ट इंडिज: सुनील अंब्रिस,शाई होप, खारी पियरे, रोस्टन चेझ, अलझरी जोसेफ, कीरोन पोलार्ड (कॅप्टन), शेल्डन कोटरेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, शिमरोन हेटमायर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, कीमो पॉल आणि हेडन वॉल्श जूनियर.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif