IND vs NZ 2nd Test Day 1 Highlights: मुश्किलमध्ये टीम इंडिया, पहिल्या दिवसाखेर न्यूझीलंडचा स्कोर 63/0

भारत-न्यूझीलंड दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेत आमने-सामने येण्यास सज्ज आहे. दोन्ही देशांमधील दुसरा आणि निर्णायक सामना क्राइस्टचर्चमध्ये खेळला जाईल. सध्या 2 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने पिछाडीवर आहे. दुसऱ्या सामन्यात त्यांच्यावर क्लीन स्वीपची टांगती तलवार आहे. या सामन्यात पराभव म्हणजे मालिका गमावलीच पण, सलग दुसऱ्या मालिकेत भारताला क्लीन स्वीपला सामोरे जावे लागेल.

29 Feb, 17:52 (IST)

भारत आणि यजमान न्यूझीलंडमधील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवशी किवी टीमने भारताला 242 धावांवर ऑलआऊट केले आणि नंतर फलंदाजी करत दिवसाखेर एकही विकेट न गमावता 63 धावा केल्या. टॉम लाथम 27 आणि टॉम ब्लंडेल 29 नाबाद धावा करून खेळत आहे. न्यूझीलंडने भारताला पहिल्या डावात 242 धावांवर ऑलआऊट केले. किवी संघाकडून दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या काईल जैमीसनने 5 गडी बाद केले, तर 3 भारतीय फलंदाजांनी अर्धशतकी कामगिरी बजावली. 

29 Feb, 16:03 (IST)

टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या भारताला न्यूझीलंडने पहिल्या डावात 242 धावांवर ऑलआऊट केले.  सामन्यात फलंदाजांनी शानदार कामगिरी बजावली. भारताकडून पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांनी अर्धशतकी डाव खेळला. पृथ्वी आणि पुजाराने 54, विहारीने 55 धावा केल्या. न्यूझीलंडकडूनकाईल जैमीसन ने तुफान गोलंदाजी केली. त्याने टेस्ट कारकिर्दीत पहिल्यांदा 5 विकेट्स घेतल्या. ट्रेंट बोल्ट आणि टिम साऊथी यांनी प्रत्येकी  2, नील वॅग्नर ने 1 गडी बाद केला.

29 Feb, 15:36 (IST)

भारत-न्यूझीलंडमधील काईल जैमीसनने भारताला सातवा झटका दिला. त्याने 58 ओव्हरच्या दुसऱ्यावर चेंडूवर रिषभ पंतला माघारी पाठवले. पंत 12 धावा करून बोल्ड झाला. 

29 Feb, 15:35 (IST)

भारत-न्यूझीलंडमधील काईल जैमीसनने भारताला सातवा झटका दिला. त्याने 58 ओव्हरच्या दुसऱ्यावर चेंडूवर रिषभ पंतला माघारी पाठवले. पंत 12 धावा करून बोल्ड झाला. 

29 Feb, 15:29 (IST)

चहाच्या वेळेनंतर भारताने सहा विकेट गमावून 200 धावांचा टप्पा गाठला. 57 ओव्हरनंतर रिषभ पंत 12 आणि रवींद्र जडेजा 0 धावा करून खेळत आहे. 

29 Feb, 15:25 (IST)

चहाच्या वेळेनंतर भारताला सहावा धक्का बसला. काईल जैमीसनने अर्धशतक करून खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराला बीजे वॅटलिंगकडे झेलबाद केले. पुजाराने 6 चौकाराच्या मदतीने 54 धावांचा डाव खेळला. 

29 Feb, 15:03 (IST)

चहाच्या अगदी आधी हनुमा विहारी म्हणून भारताला पाचवा धक्का बसला. विहारीने 55 धावांचे शानदार डाव खेळला आणि पुजाराबरोबर 81 धावांची भागीदारी केली. लंचनंतरच्या सत्रात टीम इंडियाने वर्चस्व गाजवले. फलंदाजांनी 109 धावा केल्या. या वेळेपर्यंत भारताने 5 विकेट गमावरून धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने अर्धशतक पूर्ण केले. तो सध्या 53 धावा करून खेळत आहेत. 

29 Feb, 14:55 (IST)

न्यूझीलंड आणि भारतमधील दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशीच्या चहाची वेळ झाली आहे. या वेळेपर्यंत भारताने 5 विकेट गमावरून धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने अर्धशतक पूर्ण केले. तो सध्या 53 धावा करून खेळत आहेत. हनुमा विहारी त्याला धावा करून चांगली साथ देत आहेत. लंचनंतरचे पूर्ण सत्र भारताने गाजवले. 

29 Feb, 14:16 (IST)

न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने 117 चेंडूंचा सामना करत 6 चौकाराच्या मदतीने टेस्ट करिअरमधील 25 वे अर्धशतक पूर्ण केले. या मालिकेतील पुजाराचे हे पहिले अर्धशतक आहे. 

29 Feb, 14:02 (IST)

पहिले फलंदाजी करत भारतीय 40 ओव्हर झाल्या आहेत. भारताने4 विकेट गमावून 144 धावा केल्या. हनुमा विहारी 10 आणि चेतेश्वर पुजारा 48 धावा करून खेळत आहे. 

29 Feb, 13:24 (IST)

टिम साऊथीने भारताला चौथा झटका दिला. साऊथीने पहिल्या चेंडूवर भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला रॉस टेलरकडे कॅच आऊट केले. दुसऱ्या डावात रहाणेने 27 चेंडूंचा सामना करत 1 चौकाराच्या मदतीने 7 धावा केल्या. 

29 Feb, 12:47 (IST)

टिम साऊथीने कर्णधार विराट कोहलीला एलबीडब्ल्यू आऊट केले आणि भारताला तिसरा झटका दिला. विराट पुन्हा एकदा धावा करण्यात अपयशी ठरला आणि 15 चेंडूत 3 धावा करून माघारी परतला. 

29 Feb, 12:03 (IST)

भारत-न्यूझीलंडमध्ये मालिकेतील दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हेगले ओव्हल मैदानात खेळला जात आहे. पहिल्या दिवसाच्या दुपारच्या जेवणाची घोषणा झाली आहे. या वेळेपर्यंत भारताने 2 विकेट गमावून ओव्हरमध्ये धावा केल्या आहेत. भारताकडून चेतेश्वर पुजारा 15 आणि विराट कोहली नाबाद 3 धावा करून खेळत आहेत. पृथ्वी शॉ 54 आणि मयंक अग्रवाल 7 धावा करून लंच पूर्वीच बाद झाले. ट्रेंट बोल्ट आणि काईल जैमीसन यांनी भारताला दोन झटके दिले.

29 Feb, 11:47 (IST)

काईल जैमीसनने भारताला दुसरा झटका दिला.जैमीसनने 54 धावा करून खेळणाऱ्या भारताच्या सलामी फलंदाज पृथ्वी शॉला टॉम लाथमकडे कॅच आऊट केले. लाथमने स्लिपमध्ये पृथ्वीचा एकहाती झेल पकडला. 

29 Feb, 11:44 (IST)

भारताचा सलामी फलंदाज पृथ्वी शॉने यंदाच्या न्यूझीलंड दौऱ्यावर पहिले अर्धशतक ठोकले. पृथ्वीने 61 चेंडूत 53 धावा केल्या. त्याने दुसऱ्या विकेटसाठी चेतेश्वर पुजारासह अर्धशतकही भागीदारीही पूर्ण केली. 

29 Feb, 11:25 (IST)

30 धावांवर एकही विकेट न गमावून खेळणाऱ्या भारताने 13 ओव्हरनंतर एक विकेट गमावून 58 धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉ 43 आणि चेतेश्वर पुजारा 7 धावा करून खेळत आहेत. 

29 Feb, 10:46 (IST)

सहाव्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर 30 च्या स्कोरवर ट्रेंट बोल्टने सलामी फलंदाज मयंक अग्रवालला एलबीडब्लू आऊट केले आणि भारताला पहिला झटका दिला. मयंकने पहिल्या डावात 3 धावा केल्या. 

29 Feb, 10:46 (IST)

सहाव्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर 30 च्या स्कोरवर ट्रेंट बोल्टने सलामी फलंदाज मयंक अग्रवालला एलबीडब्लू आऊट केले आणि भारताला पहिला झटका दिला. मयंकने पहिल्या डावात 3 धावा केल्या. 

29 Feb, 10:39 (IST)

टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या भारतासाठी सलामी जोडी पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवालने जोरदार सुरुवात केली आहे. 5 ओव्हरनंतर भारताने एकही विकेट न गमावता 26 धावा केल्या. पृथ्वी 23 आणि मयंक 3 धावा करून खेळत आहे. 

29 Feb, 10:20 (IST)

क्राइस्टचर्चमधील सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करण्यासाठी पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवालने भारताच्या डावाची सुरुवात कलेची. न्यूझीलंडकडून टिम साऊथीने पहिली ओव्हर टाकली. 

Read more


भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेत आमने-सामने येण्यास सज्ज आहे. दोन्ही देशांमधील दुसरा आणि निर्णायक सामना क्राइस्टचर्चमध्ये खेळला जाईल. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडने वेलिंग्टनमध्ये झलेल्या पहिल्या सामन्यात भारताचा 10 विकेटने धुव्वा उडवला. सध्या 2 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने पिछाडीवर आहे. दुसऱ्या सामन्यात त्यांच्यावर क्लीन स्वीपची टांगती तलवार आहे. या सामन्यात पराभव म्हणजे मालिका गमावलीच पण, सलग दुसऱ्या मालिकेत भारताला क्लीन स्वीपला सामोरे जावे लागेल. अशा स्थितीत, टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेली टीम इंडिया विजय मिळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. किवी टीमला जोरदार टक्कर देण्यासाठी भारताला सर्व विभागात अव्वल प्रदर्शन केले पाहिजे. पहिल्या सामन्यात फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली होती.

भारतासमोर दुसरा सामना जिंकण्यासाठी प्लेयिंग इलेव्हनची निवड करण्याची मोठी कोंडी आहे. सलामी फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) चांगली सुरुवात करूनही त्याला मोठा डाव खेळात आला नाही. मधली फळीही अपयशी ठरली.  दुसरीकडे, यजमान किवी संघाला त्यांच्या गोलंदाजांकडून विशेषतः वेगवान जोडी-ट्रेंट बोल्ट आणि टिम साऊथी यांच्याकडून ज्यांनीं मागील सामन्यात 20 पैकी 14 विकेट्स घेतल्या. किवी गोलंदाजांनी दोन्ही डावात जोरदार कामगिरी करत भारताला ऑलआऊट केले. पहिले किवी गोलंदाजांनी आणि नंतर फलंदाजांनी भारतावर दबाव कायम ठेवला. आणि आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याच्या हेतूने न्यूझीलंड टीम असाच खेळ करू पाहत असेल. (सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement