KXIP vs RR, IPL 2020 Live Streaming: किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल 2020) 13व्या सत्रातील 50वा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाईल. अबू धाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. सामना स्टार नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित होईल, तर सामन्याचे लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग Disney+ Hotstar वर उपलब्ध असेल.

किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स (Photo Credit: File Image)

KXIP vs RR, IPL 2020 Live Streaming: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13व्या सत्रातील 50वा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात खेळला जाईल. अबू धाबीच्या (Abu Dhabi) शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघांसाठी प्ले ऑफ शर्यतीतील आव्हान कायम ठेवण्यासाठी सामना जिंकणे फार महत्वाचे आहे. मुंबई इंडियन्सने पहिलेच प्ले ऑफसाठी क्वालिफाय केले आहेत, अशा स्थितीत आता सहा संघांमध्ये प्ले ऑफच्या तीन जागांसाठी लढत पाहायला मिळेल. लीगमधील प्रत्येक सामना खूप महत्वाचा असेल ज्यामुळे प्ले ऑफचे समीकरण बदलले जाईल. राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल, तर टॉस अर्धातासपूर्वी म्हणजे 7:00 वाजता होईल. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना स्टार नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित होईल, तर सामन्याचे लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग Disney+ Hotstar वर उपलब्ध असेल. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत. ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020 PlayOffs: कोलकाता नाईट रायडर्सच्या पराभवाने मुंबई इंडियन्सला मिळालं प्ले ऑफचं तिकीट, हे 3 संघही आहेत दावेदार)

दरम्यान, या मोसमात यापूर्वी दोन संघ जेव्हा आमने-सामने आले होते तेव्हा राजस्थानने विजय मिळविला होता. अशा परिस्थितीत आजच्या सामन्यात मागील पराभवाचा बदला घेण्याच्या उद्देशाने पंजाब मैदानात उतरेल. राजस्थानविरुद्ध पंजाब आपली विजयी मोहीम कायम ठेवून प्ले ऑफच्या दिशेने पुढचे पाऊल उचलण्याच्या निर्धारित असेल, तर राजस्थान आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरेल.

पाहा किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स संघ

किंग्स इलेव्हन पंजाब: केएल राहुल (कॅप्टन), मनदीप सिं, क्रिस गेल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, दीपक हूडा, क्रिस जॉर्डन, मुरुगन अश्विन, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, मयंक अग्रवाल, करुण नायर, कृष्णाप्पा गौतम, जेम्स नीशम, शेल्डन कॉटरेल, सरफराज खान, हार्डस विल्जॉईन, जगदीशा सुचित, ईशान पोरेल, मुजीब उर रहमान, तजिंदर सिंह, दर्शन नालकंडे, सिमरन सिंह, हरप्रीत ब्रार.

राजस्थान रॉयल्स: रॉबिन उथप्पा, बेन स्टोक्स, स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), संजू सॅमसन (विकेटकीपर), जोस बटलर, रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, अंकित राजपूत, कार्तिक त्यागी, वरुण आरोन, जयदेव उनाडकट, डेविड मिलर, अनिरुद्ध जोशी , मनन वोहरा, टॉम कुरन, अँड्र्यू टाय, शशांक सिंग, महिपाल लोमरोर, ओशाणे थॉमस, मयंक मार्कंडे, अनुज रावत, यशस्वी जयस्वाल, आकाश सिंह.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now