KXIP vs KKR, IPL 2020: प्रसिद्ध कृष्णा, सुनील नारायणचा भेदक मारा; केकेआरने 2 धावांनी रोमहर्षक विजय मिळवत केला पंजाबचा खेळ खल्लास
अशा स्थितीत केकेआरने 6 विकेट गमावून 164 धावा केल्या आणि किंग्स इलेव्हन पंजाबसमोर विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य ठेवले. केकेआरने दिलेल्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात किंग्स इलेव्हनला 162 धावांपर्यंत मजल मारता आली आणि केकेआरने अवघ्या 2 धावांनी विजय मिळवला.
KXIP vs KKR, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 24व्या सामन्यात टॉस जिंकून कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत केकेआरने (KKR) 6 विकेट गमावून 164 धावा केल्या आणि किंग्स इलेव्हन पंजाबसमोर (Kings XI Punjab) विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य ठेवले. केकेआरने दिलेल्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात किंग्स इलेव्हनला 162 धावांपर्यंत मजल मारता आली आणि केकेआरने अवघ्या 2 धावांनी विजय मिळवला. केकेआरला सुरुवातीच्या क्षणी विकेट मिळाले नसले तरी मोक्याच्या क्षणी गोलंदाजांनी कंबर कसली आणि कोलकाताने पंजाबवर धावांनी मात केली. किंग्स इलेव्हनकडून केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) जोडीत पुन्हा एकदा शतकी भागीदारी झाली पण ती टीमला विजयरेषा पार करून देऊ शकली नाही. राहुलने यंदाच्या आयपीएलमधील (IPL) चौथे तर मयंकने दुसरे अर्धशतक ठोकले. राहुलने 74 आणि मयंकने 56 धावा केल्या. दोघांमध्ये पुन्हा एकदा पहिल्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी झाली. केकेआरकडून प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) 3, सुनील नारायणला (Sunil Narine) 2 यश मिळाले. (KXIP vs KKR, IPL 2020: हा तर सावळा गोंधळ! KKRच्या नितीश राणाचा रनआऊट पाहून तुम्ही देखील माराल कपाळाला हात Watch Video)
केकेआरने दिलेल्या माफक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत पंजाबने अत्यंत चांगली फलंदाजी केली. किंग्स इलेव्हनकडून सलामी जोडीने चौकर-षटकार मारत संघाचा विजय जवळपास निश्चित केला, पण कोलकाताचे गोलंदाज (प्रसिद्ध आणि नारायण) मोक्याच्या क्षणी लयीत परतले आणि पंजाबच्या धावगतीवर वेसण घातले. 115च्या धावसंख्येवर मयंकला बाद करून प्रसिद्ध कृष्णाने केकेआरला पहिले यश मिळवून दिले. मयंक बाद झाल्यावर निकोलस पूरन मैदानावर आला. मोक्याची क्षणी पूरनला नारायणने 16 धावांवर परतीचा रास्ता दाखवला. त्यानंतर प्रभासीमरन सिंह आणि मनदीप सिंह देखील स्वस्तात माघारी परतले. पंजाबला अखेरच्या चेंडूवर 7 धावा हव्या असताना ग्लेन मॅक्सवेलने चेंडूत हवेत मारला, पण तो सीमारेषेच्या आत पडला आणि पंजाबला चार धावा मिळाल्या. केकेआरकडून प्रसिद्ध कृष्णा 3, सुनील नारायणला 1 यश मिळाले.
पहिले फलंदाजी करणाऱ्या नाईट रायडर्सने 20 ओव्हर 6 विकेट गमावून 164 धावा केल्या. कोलकाताकडून कर्णधार कार्तिकने 29 चेंडूत 58 धावांची खेळी केली. शुभमन गिलने 47 चेंडूत 57 धावा केल्या. कोलकाताची सुरुवात खराब झाली. तिसर्या ओव्हरमध्ये कोलकाताला पहिला धक्का बसला. अखेरच्या सामन्यात अर्धशतक ठोकणारा राहुल त्रिपाठी फक्त 4 धावा करून बोल्ड झाला. यानंतर नितीश राणा अवघ्या 2 धावा करून बाद झाला. इयन मॉर्गनने डाव हाताळण्याचा प्रयत्न केला पण 24 धावा करून तो रवी बिश्नोईचा शिकार बनला. एका बाजूने शुभमन टिकून खेळत राहिला आणि 42 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. गिलने दिनेश कार्तिकसह अर्धशतकी भागीदारी केली.