KXIP vs CSK, IPL 2020: केएल राहुलने जिंकला टॉस, किंग्स इलेव्हन पंजाब करणार पहिले फलंदाजी
आजचा हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. आजच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी पंजाबने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले, तर सीएसकेच्या अंतिम-11मध्ये कोणताही बदल झाला नाही.
किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यातील आयपीएलचा 18वा सामना थोड्याच वेळात सुरु होईल. आजचा हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. आजच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी आजवर खेळल्या चारपैकी तीन सामन्यात पराभव, तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून दोन्ही टीम विजयपथावर परतण्याचा प्रयत्न करतील. सीएसकेने (CSK) सलग तीन सामने गमावले तर पंजाबला सलग दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. आजच्या सामन्यात दोन्ही टीमचे लक्ष्य पराभवाची कोंडी फोडण्यावर असेल. आजच्या सामन्यासाठी पंजाबने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले, तर सीएसकेच्या अंतिम-11मध्ये कोणताही बदल झाला नाही. धोनीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मागील सामन्यानंतर स्वतः 100 टक्के फिट नसल्याचे काबुल केले होते. (KXIP vs CSK, IPL 2020 Live Streaming: किंग्स इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)
सीएसकेकडून पुन्हा शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस सलामीला येतील, तर अंबाती रायुडू तिसऱ्या आणि धोनी चौथ्या स्थानावर फलंदाजी करेल. रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो आणि सॅम कुरन मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील. सीएसकेने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल म्हणून केदार जाधवच्या जागी एन. जगदीशनला संधी दिली आहे. सलामी फलंदाज शेन वॉटसन आणि मधल्या फळीत केदार जाधवचे अपयश चेन्नईला महागात पडत आहे. दुसरीकडे, पंजाबने प्लेइंग इलेव्हनमधून करुण नायर, कृष्णाप्पा गौतम आणि जेम्स नीशम यांना बाहेर केले असून त्यांच्या जागी मनदीप सिंह, हरप्रीत सिंह आणि क्रिस जॉर्डनला संधी दिली आहे.
पाहा सीएसके आणि किंग्स इलेव्हनचे प्लेइंग इलेव्हन
सीएसके प्लेइंग इलेव्हन: शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, अंबाती रायडू, एमएस धोनी (कॅप्टन/विकेटकीपर), केदार जाधव, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, सॅम कुरन, पियुष चावला, शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर.
किंग्स इलेव्हन पंजाब प्लेइंग इलेव्हन: केएल राहुल (कॅप्टन/विकेटकीपर), मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, मनदीप सिंह, हरप्रीत सिंह, सरफराज खान, क्रिस जॉर्डन, मोहम्मद शमी, शेल्डन कॉटरेल आणि रवी बिश्नोई.