KXIP vs CSK, IPL 2020: केएल राहुलचे शानदार अर्धशतक, KXIPचे विजयासाठी चेन्नई सुपर किंग्स समोर 179 धावांचे टार्गेट
आजच्या सामन्यात टॉस जिंकून किंग्स इलेव्हनने पहिले फलंदाजी करत निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 178 धावा केल्या. पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने आपला शानदार फॉर्म कायम ठेवत यंदाच्या स्पर्धेत तिसरे अर्धशतक ठोकले.
इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या सत्रात चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सामना किंग्ज इलेव्हन पंजाबशी (Kings XI Punjab) सुरु आहे. आजच्या सामन्यात टॉस जिंकून किंग्स इलेव्हनने पहिले फलंदाजी करत निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 178 धावा केल्या. पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) आपला शानदार फॉर्म कायम ठेवत यंदाच्या स्पर्धेत तिसरे अर्धशतक ठोकले. राहुलने पंजाबकडून सर्वाधिक 63 धावा केल्या. यंदा आपला पहिला आयपीएल (IPL) सामना खेळणाऱ्या मनदीप सिंहने 27, तर मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) 26 धावा केल्या. राहुल आणि मयंक यांच्या पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. दुसरीकडे, सीएसकेकडून (CSK) आजच्या सामन्यात शार्दूल ठाकूरने 2, रवींद्र जडेजा आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. आजच्या सामन्यात दोन्ही संघांना विजय मिळवण्याची गरज आहे. एमएस धोनीच्या चेन्नईला यापूर्वी सलग तीन पराभवाला सामोरे जावे लागले आहेत तर पंजाबचा देखील तीन सामन्यात पराभव झाला आहे. आयपीएल गुणतालिकेत पंजाब 7व्या तर चेन्नई 8व्या स्थानावर आहे. (IPL 2020: 'वय, काहींसाठी फक्त आकडा तर काहींसाठी संघातून स्थान गमावण्याचं कारण'! इरफान पठाणच्या ट्विटने चर्चांना उधाण, एमएस धोनी फॅन्स निराश)
चेन्नईविरुद्ध पहिले फलंदाजी करण्यासाठी राहुल आणि मयंकची जोडी मैदानावर आली. चेन्नईच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर या जोडीने पॉवरप्लेमध्ये 46 केल्या. 9व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर सॅम कुरनने मयंकला 26 धावांवर कॅच आऊट केले. दुसरी विकेट मनदीपच्या रूपात पडली. रवींद्र जडेजाने अंबाती रायुडूकडे मनदीप 27 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर निकोलस पूरन राहुलसोबत चांगली भागीदारी केली आणि चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शार्दूल ठाकूरने पुरनला 33 धावांवर बाद करून राहुल आणि त्याची भागीदारीत मोडली. 18व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर शार्दूलने पुरनला आणि पुढील चेंडूवर राहुलला 63 धावांवर धोनीकडे झेलबाद केले. सरफराज खान 14 आणि ग्लेन मॅक्सवेल 11 धावा करून नाबाद परतले.
दरम्यान, आजच्या सामन्यासाठी किंग्स इलेव्हन पंजाबने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले. करुण नायर, कृष्णाप्पा गौतम आणि जिमी नीशम यांच्याऐवजी मनदीप सिंह, हरप्रीत ब्रार आणि क्रिस जॉर्डन यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाला आहे.