IPL Auction 2025 Live

IND vs HK, Asia Cup 2022 Live Streaming: भारत-हाँगकाँग सामना केव्हा आणि कुठे विनामूल्य पाहायचा घ्या जाणून, आशिया चषक पात्रता सामने जिंकून हाँगकाँगने इथपर्यंत मारली मजल

हाँगकाँग पात्रता स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या बळावर ते इथपर्यंत पोहोचले आहेत आणि ते भारताविरुद्ध पुन्हा चांगली कामगिरी करतील अशी आशा संघाला असेल.

India vs Hong Kong

सध्या सुरू असलेल्या आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) च्या चौथ्या क्रमांकाच्या सामन्यात भारत हाँगकाँगशी (IND vs HK) भिडणार आहे, कारण रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पाच विकेट्सने पराभूत केले आणि आशिया चषकात शानदार सुरुवात केली, हाँगकाँगने आशिया चषक पात्रता जिंकली आणि या स्पर्धेसाठी त्याचा सामना भारताशी होणार आहे. हा सामना 31 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार 7:30 वाजता होणार आहे. भारताच्या गोलंदांजी आणि फलदांजीच्या कामगिरीनंतर पाकिस्तानची धुलाई झाली. हार्दिक पंड्या 33 धावा आणि तीन विकेट्स घेऊन सामनावीर ठरला, विराट कोहलीही सर्वाधिक धावा करणारा 35 धावा करून फॉर्ममध्ये परतला. हाँगकाँगविरुद्ध त्यांना असाच खेळ खेळायचा आहे आणि वर्चस्व गाजवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

हाँगकाँगसाठी क्वालिफायरनंतर पुढे चालू ठेवणे हा चांगला खेळ असेल. पात्रता स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या बळावर ते इथपर्यंत पोहोचले आहेत आणि ते भारताविरुद्ध पुन्हा चांगली कामगिरी करतील अशी आशा संघाला असेल.

भारत-हाँगकाँग सामना लाइव्ह कुठे पाहणार

आशिया कप लाइव्ह स्ट्रीमिंग स्टार नेटवर्कवर प्रसारित केले जात आहे, त्यामुळे स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर थेट सामना पाहिला जाईल. आशिया चषक 2022 स्पर्धेचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. आशिया कप ही एक जागतिक स्पर्धा आहे जी आशियाई क्रिकेट परिषद (ACC) द्वारे आयसीसीच्या देखरेखीखाली आयोजित केली जाते. या स्पर्धेतील सर्व सामने स्टार स्पोर्ट्सच्या विविध वाहिन्यांवर थेट प्रक्षेपित केले जातील. स्पर्धेचे Online Streaming डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर उपलब्ध असेल, ज्याद्वारे (भारत विरुद्ध  हाँगकाँग सामना) मोबाईल किंवा लॅपटॉपवर सामनाचा आनंद घेता येईल.

तुम्ही या सामन्याचा विनामूल्य घेऊ शकता आनंद 

आशिया चषक 2022 मधील भारतीय संघाचे सर्व सामने दूरदर्शनच्या स्पोर्ट्स चॅनलवर (DD Sports) प्रसारित केले जातील. तुमच्याकडे डीडी फ्री डिश कनेक्शन असल्यास, भारत विरुध्द हाँगकाँगचे सामने कोणत्याही सदस्यत्वाशिवाय दूरदर्शनच्या स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येतील. भारत विरुध्द हाँगकाँग सामना विनामूल्य पाहण्याचा एक मार्ग म्हणजे जिओ नेटवर्कच्या सिमसह लॉग इन करून, तुम्ही जिओ टीव्हीवर विनामूल्य सामना पाहू शकता. (हे देखील वाचा: BNG vs AFG, Asia Cup 2022 Live Streaming Online: बांग्लादेश- अफगाणिस्तान आज एकमेकांशी भिडणार; जाणून घ्या कधी आणि कुठं पाहणार सामना?)

याशिवाय थोप टीव्ही हे सामने विनामूल्य पाहण्याचे माध्यम आहे. यावेळी भारत-हाँगकाँग सामन्यासह आशिया कपमधील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण 132 देशांमध्ये केले जाणार आहे. स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स देखील भारतात आशिया कपचे थेट प्रक्षेपण करतील. आशिया कपचे सामने भारतीय उपखंडाबाहेर पाहण्याची ही पहिलीच वेळ असेल.