IPL Auction 2025 Live

ICC World Cup 2023 Schedule: भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाला 5 ऑक्टोबरपासुन होणार सुरुवात, वेळापत्रक, ठिकाण यासह प्रत्येक तपशील घ्या जाणून

विश्वचषकाचा अंतिम सामनाही याच मैदानावर होणार आहे. आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये एकूण 10 संघ खेळणार आहेत.

ICC Cricket World Cup (Photo Credit - Twitter)

ICC World Cup 2023 Schedule: भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचे (ICC Cricket World Cup 2023) आयोजन करण्यात येणार आहे. या मेगा स्पर्धेत भारतासह एकूण 10 संघ सहभागी होत आहेत. 45 दिवस चालणाऱ्या या विश्वचषकात एकूण 48 सामने खेळवले जाणार असून त्याचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात 5 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषकाचा अंतिम सामनाही याच मैदानावर होणार आहे. आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये एकूण 10 संघ खेळणार आहेत, ज्यात भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. दोन वेळचा विजेता वेस्ट इंडिज प्रथमच विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार नाही.

आयसीसी विश्वचषक 2023 बद्दल सर्व काही घ्या जाणून...

आयसीसी विश्वचषक 2023 कधी होणार आहे?

विश्वचषक 2023 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.

आयसीसी विश्वचषक 2023 कुठे होणार आहे?

विश्वचषक भारतात होणार आहे. आयसीसी विश्वचषकाचे संपूर्ण आयोजन करण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 1987, 1996 आणि 2011 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासोबत संयुक्तपणे वर्ल्ड कपचे आयोजन केले होते.

आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये किती संघ सहभागी होतील?

आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये एकूण 10 संघ सहभागी होत आहेत, ज्यात भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.

आयसीसी विश्वचषक 2023 चे सामने कोणत्या शहरात होणार आहेत?

आयसीसी विश्वचषक 2023 चे 48 सामने खेळवले जाणार आहे आणि ते भारतातील एकूण 10 शहरांमध्ये होणार आहेत, ज्यात अहमदाबाद, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद आणि धर्मशाला यांचा समावेश आहे.

आयसीसी विश्वचषक 2023 चे उपांत्य फेरीचे सामने कुठे खेळवले जातील?

आयसीसी विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे खेळवला जाईल आणि दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी ईडन गार्डन्स, कोलकाता येथे खेळला जाईल.

आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये भारत-पाकिस्तान सामना कधी आणि कुठे होईल?

आयसीसी विश्वचषक 2023 मधील भारत-पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. यापूर्वी हा सामना 15 ऑक्टोबरला होणार होता, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव गुजरातमध्ये त्याच दिवशीपासून नवरात्र सुरू होण्याच्या एक दिवस आधी ठेवण्यात आला आहे.

आयसीसी विश्वचषक 2023 चे सामने तुम्ही लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता?

डिस्ने + हॉटस्टारवर आयसीसी विश्वचषक 2023 सामन्यांचे लाइव्ह स्ट्रींमिग पाहता येईल. डिस्नेने विश्वचषकातील सर्व सामने मोफत दाखवण्याची घोषणा केली आहे, म्हणजेच तुम्ही मोबाईलवर डिस्ने + हॉटस्टारवर सर्व विश्वचषक सामने विनामूल्य पाहू शकता.

आयसीसी विश्वचषक 2023 सामन्यांचे थेट प्रक्षेपण तुम्ही कोठे पाहू शकता?

आयसीसी विश्वचषक 2023 सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.

आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये कोणत्या सामन्यांसाठी राखीव दिवस आहेत?

आयसीसी विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत तसेच स्पर्धेच्या अंतिम फेरीत एक राखीव दिवस असेल. नियोजित सामन्याच्या तारखेच्या एक दिवसानंतर राखीव दिवस होतील.

आयसीसी विश्वचषक 2023 साठी सर्व 10 संघ कसे ठरले पात्र?

भारत यजमान म्हणून पात्र ठरल्यानंतर, पुढील सात संघ आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक सुपर लीग क्रमवारीच्या आधारे ठरवले गेले. ही लीग तीन वर्षांची लीग होती ज्यामध्ये प्रत्येक 13 संघांनी आठ तीन सामन्यांच्या द्विपक्षीय मालिका खेळल्या होत्या. न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या सर्व देशांनी अव्वल क्रमवारी मिळवून क्रिकेट विश्वचषकासाठी पात्रता मिळवली. श्रीलंका आणि नेदरलँड्स सुपर लीगमध्ये अनुक्रमे 10व्या आणि 13व्या स्थानावर राहून क्वालिफायरद्वारे विश्वचषक 2023 मध्ये पोहोचले.

आयसीसी विश्वचषक 2023 चे सराव सामने कधी आणि कुठे होणार आहेत?

आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये सर्व 10 संघ प्रत्येकी दोन सराव सामने खेळतील. भारतातील हैदराबाद, तिरुअनंतपुरम आणि गुवाहाटी या तीन शहरांमध्ये विश्वचषकाचे सराव सामने आयोजित केले जातील. 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने खेळवले जातील. सर्व सराव सामने दुपारी 2 वाजता सुरू होतील.

आयसीसी विश्वचषक 2023 चे स्वरूप काय आहे?

आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये सिंगल राऊंड रॉबिन फॉरमॅटवर आधारित, सर्व 10 संघ ग्रुप स्टेजमध्ये किमान एकदा एकमेकांना सामोरे जातील आणि त्यानंतर अव्वल चार संघ उपांत्य फेरीत जातील. राऊंड रॉबिन लीग संपल्यानंतर, गुणतालिकेतील अव्वल संघ उपांत्य फेरीत चौथ्या स्थानावर असलेल्या संघाचा सामना करेल आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाचा सामना तिसऱ्या स्थानावरील संघाशी होईल. दोन्ही उपांत्य फेरीतील विजेते संघ 19 नोव्हेंबर रोजी विश्वचषक अंतिम फेरीत आमनेसामने येतील.