जोस बटलरने रोहित शर्माच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप, इंग्लंड फलंदाजाने केले बॅटिंगचे कौतुक, पाहा काय म्हणाला

राजस्थान रॉयल्सच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केलेल्या बटलरच्या इंस्टाग्राम लाइव्ह सत्राच्या व्हिडिओमध्ये म्हणाला, "मला वाटते रोहित शर्मा एक उत्तम खेळाडू आहे."

रोहित शर्मा आणि जोस बटलर (Photo Credit: Getty Images)

इंग्लंडचा फलंदाज जोस बटलरने (Jos Buttler) टीम इंडियाचा (Team India) 'हिटमॅन' रोहित शर्माचे (Rohit Sharma) कौतुक करताना भारतीय सलामीवीर उत्कृष्ट खेळाडू असल्याचे वर्णन केले जो जास्त प्रयत्न न करता मोठी शतके ठोकून विरोधी संघाला हरवू शकतो. राजस्थान रॉयल्सच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केलेल्या बटलरच्या इंस्टाग्राम लाइव्ह सत्राच्या व्हिडिओमध्ये म्हणाला, "मला वाटते रोहित शर्मा एक उत्तम खेळाडू आहे." बटलरने भारतीय संघाच्या (Indian Team) मर्यादित शतकारांचा कर्णधार रोहितच्या फलंदाजीचे कौतुक केले. राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल खेळणार्‍या बटलरने राजस्थान संघाचा सहकारी आणि न्यूझीलंडचा संघाचा फिरकीपटू ईश सोधीशी चॅट करताना मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहितची स्तुती केली आहे आणि रोहितने सर्वात जास्त प्रभावित केल्याचे सांगितले. (ICC ने शेअर केलेल्या आकडेवारीत विराट कोहलीने पटकावले अव्वल स्थान, रोहित शर्माचा 'या' लिस्टमध्ये समावेश, पाहा)

बटलरने म्हटले की, "मला वाटते रोहित एक मजबूत खेळाडू आहे. भारतातील फारच थोड्या खेळाडूंकडे अशी अप्रतिम शैली आहे." बटलर पुढे म्हणाला की "एकदा रोहितला चांगली सुरुवात मिळाल्यावर तो मोठी धावसंख्या करतो आणि तो अशा प्रकारे खेळणे प्रभाव पडतो. गेल्या वर्षी विश्वचषकात त्याने 4-5 शतकं ठोकली होती." बटलर आणि रोहित आयपीएल 2016 आणि 2017 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळले आहेत. भारतीय खेळाडू आता उसळत्या चेंडूंचा सामना करण्यास अधिक चांगल्या स्थितीत असल्याचा बटलरचा विश्वास आहे. तो म्हणाला, "मला वाटते काही वर्षांपूर्वी लोक भारतीय खेळाडूंविरूद्ध शॉर्ट पिच बॉल वापरत असत परंतु रोहित त्यांच्यावर मोठे शॉट्स खेळत असतो. यानंतर आपण फुल्ल लेंथ गोलंदाजी करतो आणि त्यावरही तो चेंडू मैदानाबाहेर पाठवितो."

रोहित हा मर्यादित षटकांच्या स्वरूपातील जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू मानला जातो आणि आयसीसीच्या वनडे फलंदाजी क्रमवारीत तो भारतीय कर्णधार विराट कोहलीनंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे. वनडे क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतके ठोकणारा मुंबईचा फलंदाज जगातील एकमेव फलंदाज आहे.