'तू कुरूप आहेसं' म्हणत चाहत्याने जोफ्रा आर्चर याला केले ट्रोल, इंग्लंड गोलंदाजाने Twitter वर शानदार प्रत्युत्तर देत केली बोलती बंद

इंग्लंड चा प्रसिद्ध जलद गोलंदाज जोफ्रा आर्चरने पुन्हा त्याच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देत पुन्हा एकदा सिद्ध केले की तो शब्दांच्याबाबतीत किती चांगला आहे. त्याने त्या व्यक्तीला अतिशय मोहक पद्धतीने उत्तर दिले. त्या माणसाने लिहिले: “तू कुरूप आहेस."

जोफ्रा आर्चर (Photo by Clive Mason/Getty Images)

जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याच्याबरोबर ट्विटरवर पागां घेणे ही कदाचित योग्य गोष्ट नाही. इंग्लंड (England) संघाचा प्रसिद्ध जलद गोलंदाज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. ट्विटरवर आर्चरने चांगले कार्य करणे केवळ अकल्पनीय आहे आणि एका चाहत्याने हे अलीकडेच शिकले. पण त्याला आवडणाऱ्या मार्गाने नाही. विश्वचषकदरम्यान आर्चर ट्विटरवर चांगलाच लोकप्रिय झाला होता. त्याच्या जुन्या ट्विट्सने सोशल मीडियावर धम्माल केली होती. शिवाय सामन्यांच्या निकालांपैकी आर्चरचे काही ट्विट स्पर्धेदरम्यान व्हायरल झाले होते. बार्बाडोसमध्ये जन्मलेल्या आर्चरने इंग्लंडमध्ये यजमानांनी जिंकलेल्या विश्वचषक दरम्यान घडलेल्या जवळपास सर्वच गोष्टींबाबतचे ट्विट्स हिट झाले होते. आणि यामुळे काही वेळाने त्याची फॅन फॉलोइंगदेखील मोठ्या संख्येने वाढली. (Independence Day 2019: स्वातंत्र्य दिनी लेह येथे तिरंगा फडकावण्याचा Lt Col महेंद्र सिंह धोनीला मिळाला मान, जाणून घ्या सविस्तर)

जेव्हा जेव्हा आर्चर ट्विट पोस्ट करायचा तेव्हा चाहत्यांना ते आवडायचे. त्याने गुरुवारी आणखी एक ट्विट केले. त्याच्या पहिल्या व्हिडिओची ती एक यूट्यूब क्लिप होती. पण त्याच्या अनेक फॉलोअर्जना त्याचा हा व्हिडिओ पाहण्यास उत्सुक होती, त्यापैकी एकाने तिरस्करणीय ट्विटद्वारे आर्चरच्या रंगाचा प्रश्न उपस्थित केला. आर्चरने पुन्हा त्याच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देत पुन्हा एकदा सिद्ध केले की तो शब्दांच्याबाबतीत किती चांगला आहे. त्याने त्या व्यक्तीला अतिशय मोहक पद्धतीने उत्तर दिले. त्या माणसाने लिहिले: “तू कुरूप आहेस." प्रत्युत्तरात, आर्चरने आपली श्रेष्ठता दाखवली आणि लिहिले, "आणि तू खूप देखणा आहेस 😊"

दरम्यान, आर्चर सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध लॉर्ड्स टेस्ट सामन्यासाठी योग्य वेळी आपली फिटनेस सिद्ध करेल अशी अपेक्षा आहे. आर्चर यंदा दुसऱ्या अ‍ॅशेस टेस्टपासून इंग्लंडची टेस्टमध्ये पदार्पण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसन याला दुखापतीमुले दुसऱ्या अ‍ॅशेस टेस्टमधून माघार घायवी लागली आहे. त्यामुळे आर्चरला त्याच्या जागी संघात स्थान दिले जाऊ शकते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement