IPL 2020: राजस्थान रॉयल्सला बसला मोठा धक्का, जोफ्रा आर्चर 13 व्या आयपीएल टूर्नामेंटमधून बाहेर
यापूर्वी, 2008 टूर्नामेंट विजेता फ्रँचायझी राजस्थान रॉयल्स यांना मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला स्पर्धेतून बाहेर करण्यात आले आहे. आर्चर बऱ्याच काळापासून दुखापतीतून सावरण्याच्या प्रयत्नात आहे.
आयपीएल (IPL) 2020 ची सुरुवात 29 मार्चपासून होत आहे. यापूर्वी, 2008 टूर्नामेंट विजेता फ्रँचायझी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांना मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याला स्पर्धेतून बाहेर करण्यात आले आहे. आर्चर बऱ्याच काळापासून दुखापतीतून सावरण्याच्या प्रयत्नात आहे. याच कारणास्तव तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टेस्ट मालिका खेळण्यास सक्षम नव्हता ज्याने करून त्याला बाहेर करण्यात आले होते. इंग्लंड (England) टीमसाठी देखील हे एक मोठा धक्का आहे, कारण तो आता श्रीलंका दौऱ्यावर जाऊ शकणार नाही. आर्चरच्या कोपऱ्याला स्ट्रेस फ्रॅक्चर झाले आहे. (IPL 2020: यावर्षीपासून आयपीएलमध्ये लागू होणार 3 नवीन महत्त्वपूर्ण नियम, सौरव गांगुली ने केल्या अनेक मोठ्या घोषणा, जाणून घ्या)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर माहिती शेअर केली की जोफ्रा आर्चरला एल्बोचा त्रास झाला आहे आणि त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतूनही बाहेर करण्यात आले आहे. शिवाय, तो यावर्षी आयपीएलमधेही भाग घेऊ शकणार नाहीत. 19 ते 31 मार्च दरम्यान इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्ससाठी हा एक मोठा झटका आहे. आर्चर हा राजस्थानचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. राजस्थानसाठी 2019मध्ये आर्चरने 11 सामन्यांमध्ये 26 विकेट्स घेतल्या आहेत. यासह त्याने 134 च्या स्ट्राइक रेटनेही 82 धावा केल्या आहेत.
आर्चरने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात खेळला. यानंतर तो एकही सामना खेळला नाही. अशा स्थितीत इंग्लंडला पहिल्यांदा विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या कॅरिबियन गोलंदाजीचा त्रास झाला असल्याचे स्पष्ट होते. विश्वचषक 2019 आधी इंग्लंडकडून त्याला डेब्यू करण्याची संधी मिळाली. कमी अनुभव असूनही त्याला विश्वचषक संघात स्थान देण्यात आले होते आणि तेथे त्याने निराश केले नाही. न्यूझीलंडविरुद्ध फायनलमध्ये त्यानेच सुपर-ओव्हर टाकली होती. शेवटच्या षटकात वेगवान आणि अचूक यॉर्कर टाकून आर्चर फलंदाजांना त्रास देण्यात सक्षम आहे. आणि आता त्याच्या अनुपस्थितीमुळे संघाला डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजीसाठी नवीन पर्याय शोधावा लागणार आहे.