Joe Root Steps Down: ‘कॅप्टन’ जो रूट पायउतार, इंग्लंड कसोटी संघाच्या सततच्या खराब कामगिरीनंतर घेतला निर्णय; आता ‘हा’ धाकड अष्टपैलू बनेल मुख्य दावेदार
Joe Root Steps Down: जो रूटने शुक्रवारी इंग्लडच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि म्हटले की, सर्वोच्च पदावरून पायउतार होण्याची हीच योग्य वेळ आहे. खेळाच्या सर्वात प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये इंग्लंडने अॅशेस 4-0 ने गमावली आणि वेस्ट इंडिजकडून 1-0 ने पराभवाचा सामना करावा लागला. ECB ने अद्याप नवीन कर्णधाराची घोषणा केली नाही, पण अष्टपैलू बेन स्टोक्स जबाबदारीसाठी मुख्य दावेदार आहे.
Joe Root Steps Down: इंग्लंडचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार जो रूट (Joe Root) शुक्रवारी टेस्ट संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार झाला आणि 2017 मध्ये सर एलिस्टर कूक (Alastair Cook) याची जागा घेतल्यापासून सुरू झालेल्या चढउताराच्या कार्यकाळाचा शेवट केला. रूटने इंग्लंड क्रिकेटच्या (England Cricket) इतिहासातील सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून कार्यकाळ संपवला. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेला थ्री लायन्स संघ रूटच्या नेतृत्वात गेल्या काही काळापासून मायदेशात आणि विदेशात सातत्यपूर्ण विजय मिळवण्यासाठी धडपडत होता. ECB ने अद्याप 31 वर्षीय रूटच्या जागी इंग्लंडचा कसोटी कर्णधार नाव जाहीर केलेले नाही परंतु बेन स्टोक्स (Ben Stokes) या भूमिकेसाठी आघाडीवर आहे.
इंग्लंडला या वर्षाच्या सुरुवातीला एशेसमध्ये ऑस्ट्रेलियाकडून 0-4 आणि नुकत्याच पूर्ण झालेल्या कॅरिबियन दौऱ्यावर वेस्ट इंडिजविरुद्ध 0-1 असा पराभव पत्करावा लागल्यानंतर रूटचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रेनेडातील तिसर्या कसोटीत 10 गडी राखून झालेल्या पराभवानंतर, रूट म्हणाला होता की त्याला पुढे खेळायचे आहे आणि इंग्लंडला घसरगुंडीतून बाहेर काढायचे आहे परंतु स्टार कसोटी फलंदाजाने विचार बदलल्याचे दिसत आहे. लक्षणीय आहे की इंग्लंड संघाला त्यांच्या शेवटच्या 17 कसोटींमध्ये फक्त एकच विजय मिळवता आला, ज्यामुळे इंग्लंड संघाचे माजी संचालक ऍशले जाईल्स आणि मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांच्यासह व्यवस्थापन व सपोर्ट स्टाफमधील अनेक सदस्यांची हकालपट्टी करण्यात आली.
इंग्लंडचा पुरुष कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने आणि विजय मिळवण्याचा विक्रम रूटच्या नावावर आहे. त्याच्या 27 विजयांनी त्याला माइकल वॉन (26), सर एलिस्टर कुक आणि सर अँड्र्यू स्ट्रॉस (प्रत्येकी 24) यांच्यापेक्षा पुढे नेले आहे. 2017 मध्ये कुक पायउतार झाल्यानंतर रूटची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या 12 महिन्यांत कर्णधार म्हणून रूटच्या डावपेचांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते, परंतु बॅटने त्याची कामगिरी कधीही चिंतेचा विषय नव्हती. कर्णधार म्हणून रुटने 64 कसोटीत 14 शतके आणि 26 अर्धशतकांसह 46.44 च्या सरासरीने 5295 धावा केल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)