Joe Root Record: कसोटी क्रिकेटमध्ये 'जो रुट'चे वादळ, श्रीलंकेविरुद्ध बॅक टू बॅक शतके झळकावून रचला इतिहास; अनेक विक्रमांना गवसणी

या कसोटी शतकासह त्याने ॲलिस्टर कूकचा विक्रमही मोडीत काढला

Joe Root (Photo Credit - X)

ENG vs SL 2nd Test: इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज जो रूटने (Joe Root) श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (ENG vs SL 2nd Test) दुसऱ्या सामन्यात लॉर्ड्सवर पहिल्या डावात शतक झळकावले होते आणि त्यानंतर दुसऱ्या डावातही शानदार शतक झळकावले आहे. दुसऱ्या डावात जो रूटने 121 चेंडूंचा सामना केला आणि 10 चौकारांच्या मदतीने 103 धावा केल्या आणि हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील 34 वे शतक ठरले. या कसोटी शतकासह त्याने ॲलिस्टर कूकचा विक्रमही मोडीत काढला. या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात जो रूटने 143 धावा केल्या होत्या. (हे देखील वाचा: Most Hundred In WTC: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतक झळकवणारे टाॅप 5 फलंदाज, यादीत फक्त एकच भारतीय खेळाडू)

इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी शतके जो रूटच्या नावावर 

जो रूटने 145व्या कसोटी सामन्यात आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील 34वे शतक झळकावले आणि तो आता इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी शतक करणारा फलंदाज बनला आहे. याआधी हा विक्रम ॲलिस्टर कुकच्या नावावर होता, ज्याने इंग्लंडकडून 161 कसोटी सामन्यांमध्ये 33 शतके झळकावली होती.

इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी शतके

34- जो रूट

33- ॲलिस्टर कुक

23- केविन पीटरसन

22- वॅली हॅमंड

22- कॉलिन काउड्री

22- जेफ्री बॉयकॉट

22- इयान बेल

जो रूटने अझहर अलीची केली बरोबरी

जो रूटने कसोटी क्रिकेटमधील 33 वे शतक झळकावले, पण श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी कारकिर्दीतील हे सहावे शतक होते. या शतकासह त्याने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत 6 शतके झळकावणाऱ्या अझर अलीची बरोबरी केली. या संघाविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत जो रूट आता अझहर अलीसोबत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत सचिन तेंडुलकर 9 शतकांसह पहिल्या तर युनूस खान 8 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

श्रीलंकेविरुद्धचे सर्वोच्च कसोटी शतक

9 – सचिन तेंडुलकर

8 – युनूस खान

6 – अझहर अली

6 – जो रूट

लॉर्ड्सवर दोन्ही डावात शतके झळकावणारा जो रूट चौथा फलंदाज 

जो रूटने श्रीलंकेविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावांत शतके झळकावली आणि अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी हा पराक्रम वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज जॉर्ज हॅडलीने 1939 साली केला होता तर इंग्लंडच्या ग्रॅहम गूचने 1990 साली केला होता. त्यानंतर 2004 मध्ये लॉर्ड्सवर मायकेल वॉनने हा पराक्रम केला होता आणि आता 20 वर्षांनंतर जो रूटने या मैदानावर हा पराक्रम केला आहे.

लॉर्ड्सवर कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावणारे फलंदाज

106 आणि 107 - जॉर्ज हॅडली (वेस्ट इंडीज) विरुद्ध इंग्लंड, 1939

333 आणि 123 - ग्रॅहम गूच (इंग्लंड) विरुद्ध भारत, 1990

103 आणि 101* - मायकल वॉन (इंग्लंड) विरुद्ध वेस्ट इंडीज, 2004

143 आणि 103 जो रुट (इंग्लंड) श्रीलंका, 2024

Tags

Dan Lawrence England England cricket team england cricket team vs sri lanka national cricket team match scorecard england cricket team vs sri lanka national cricket team players england national cricket team England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team 1st Test Scorecard England vs Sri Lanka Matthew Potts milan rathnayake Ollie Pope SL vs ENG Sri Lanka sri lanka national cricket team sri lanka national cricket team vs england cricket team match scorecard Sri Lanka vs England डॅन लॉरेन्स इंग्लंड इंग्लंड क्रिकेट संघ इंग्लंड क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ सामना स्कोअरकार्ड इंग्लंड क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ खेळाडू इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ इंग्लंड विरुद्ध श्रीलंका मॅथ्यू पॉट्स मिलन रथनायके ओली पोप एसएल विरुद्ध ईएनजी श्रीलंका श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघ सामना स्कोअरकार्ड श्रीलंका विरुद्ध इंग्लंड Joe Root Record Joe Root Century जो रुट शतक जो रुट रेकाॅर्ड